जिल्हा

रत्नत्रय प्री स्कूल प्रथम वर्धापन उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

रत्नात्रे प्री इंग्लिश स्कूल नातेपुते चा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शनिवार दिनांक १५/६/२४ स्कूलचा प्रथम वर्धापन दिन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, डॉ एम पी मोरे चेअरमन सर प्रमोद भैया,सभापती श्री वैभव शहा श्री ,,अमित गांधी, श्री प्रीतम दोशी , श्री रोनक चंकेश्वरा , श्रीअजय गांधी, श्री विनय दोबाडा, श्रीदत्ता भोसले श्री तुषार देसाई सौ निकिता शहा सौ प्रीती दोशी सौ पुजा कर्चे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एम पी मोरे यांच्या उपस्थितीत होते. प्रसंगी मुलांना खाऊ वाटप करनात आला . कार्यक्रमासाठी पाल, विद्यार्थ, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या इन्चार्ज सौ माधवी रणदिवे मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन सविता देसाई मॅडम व्यक्त यांनी केले.

जि प शाळा पिरळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिस बागेत फुलवला भाजी पाल्यांचा मळा.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जि प शाळा पिरळे येथील शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात अनोखा उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या परिसरात परिस बागेसाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे याचे उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक यांनी एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवले आहे. शाळेमध्ये मध्यान भोजन योजना सुरू आहे. या यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्य अन्नासाठी दररोज बाहेरून पालेभाज्या आणाव्या लागतात. ह्या पालेभाज्या आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा बराचसा वेळ व पैसे खर्च होतात. तसेच तो भाजीपाला ऑरगॅनिक पद्धतीचा व विषमुक्त मिळत नाही. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा लागतो. यावर मुख्याध्यापक व काही शिक्षकांना एक भन्नाट संकल्पना सुचली ती म्हणजे शाळेच्या परिसरात ऑरगॅनिक पद्धतीचा भाजीपाल्याचा मळा तयार करण्याची.मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली. संजय ढवळे सर, हनुमंत फुले, जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर, सचिन निगडे सर, शिक्षिका, शेंडगे मॅडम, मुलाणी मॅडम, व नामदेव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परिश्रम घेत.शाळेच्या परिस बागेत अक्षरशा भाजीपाल्याचा मळा फुलवला.यामध्ये प्रामुख्याने शेवगा ,वांगी , टोमॅटो, दुधी भोपळा , घोसावळे , फ्लॉवर , मिरची ,कोबी, कढीपत्ता ,कोथिंबीर,मेथी , पालक , घेवडा , दोडका ,अशा ऑरगॅनिक विषमुक्त पाल्या भाज्यांचा समावेश आहे. या उपक्रमाने महाराष्ट्र भरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

दहिगाव येथे आ.राम सातपुते यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
दहिगाव तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील  व सामाजिक कार्यकर्ते ते माळशिरस तालुका भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त   विविध कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन  आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, पत्रकार प्रमोद शिंदे, संदीप सावंत, संभाजी फुले, तसेच दहिगाव येथील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील   कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते. 100 रक्तदात्यांनी  रक्तदान रक्तदान केले. ज्ञानदीप ब्लड बँक यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान यशस्वी होण्यासाठी शिव शक्ती प्रतिष्ठान व बाळासाहेब कदम व संदीप सावंत  मित्र परिवार  साॅईल टच अॅग्रो बारामती  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पिरळे तालुका माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष समाज रत्न स्व.मानसिंगराव उर्फ आबासाहेब शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन दादासाहेब मानसिंगराव शिंदे यांची निवड माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष,आनंद बनसोडे प्रदेशाध्यक्ष,ज्ञानेश्वरपरदेसी प्रदेश सचिव यांच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवडीने महाराष्ट्रातील अनेक वर्ष मागास असलेला धनगर समाज यांच्या आरक्षण मिळवून देण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमुख भूमिका साकारतील अशी अपेक्षा संघटनेने दादासाहेब शिंदे यांच्याकडून बाळगलेली आहे.सदर निवडीने पिरळे व परिसरातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पिरळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
    पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोमवार दिनांक 17जुलै रोजी सकाळी दहा वाजता जि प शाळा परळी येथे
    ग्रामपंचायत पिरळे व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था यांचे संयुक्त विद्यमाने
    *भव्य रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे ब्रिलियंट संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले होते अनेक महिलांनी या शिवण क्लास प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वाटपासोबत रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यातत आले आहे या स्पर्धेसाठी
    *प्रथम बक्षीस**
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    द्वितीय वक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    तृतीय बक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीस असून स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम राहतील
    स्पर्धा नियम*
    (१) स्पर्धेसाठी रांगोळी स्वतःची आणावी.
    (२) रांगोळी काढताना त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे
    (३) रांगोळी काढताना स्वतः चे नाव टाकायचे नाही संयोजक कडून नंबर घेउन टाकायचा.
    (४) रांगोळीचे बक्षिसाचे नंबर हे तुमच्या रांगोळीतून सामाजिक संदेश, आकृती, रंगरंगोटी कशी आहे यावर अवलंबून असते. यावर तक्रार चालणार नाही.
    *(५) रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे **
    (६) रांगोळी स्पर्धेत कोर्स करणाऱ्या महिलांनी व बाहेरील महिलांनी ही सहभाग घेऊ शकतात.
    (७) रांगोळी स्पर्धाचे परीक्षक हे बाहेरील असतील. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    दिनांक १७जुलै २०२३वार सोमवार वेळ सकाळी १०.००वाजता*
    ठिकाण :- जि.प.प्राथमिक शाळा पिरळे*
    तरी सर्वांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान पिरळे गावचे सरपंच सुनिल दडस, उपसरपंच अमोल शिंदे ,ग्रामसेवक हनुमंत वगरे द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी केले आहे.

पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे असे प्रतिपादन ऍड. डॉ.केवल उके यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्र च्या झाडे लावा झाडे जगवा, माजी वसुंधरा,जलशक्ती बेटी बचाव अभियानांतर्गत.महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध शाळेला आदर्श शाळा पुरस्कार तसेच विविध संस्था आदर्श ग्रामपंचायत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते,अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी चॅनलचे संचालक  विवाह  कायदा मसुदा  समिती सदस्य महाराष्ट्र शासन एन डी एम जे राज्य महासचिवडॉ केवल उके म्हणाले की .डॉ.केवल उके बोलताना म्हणाले आम्ही हे छोटस रोपट म्हणून लावलं होतं.आता त्याचा वटवृक्ष होतानाचा दिसतोय पुढे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रची  अशाच पद्धतीने प्रगती होत राहील.


 माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र चे काम हे उल्लेखनीय आहे.त्यांनी शोध पत्रकारिते सोबत समाज उपयोगी अनेक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवले आहेत त्यांच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवड झाली आहे. हे कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एम के इनामदार, एन डी एम जे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, उद्योजक विनोद जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धवासी आदर्श शिक्षिका कुमारी सविता साळवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी  डॉ.एम के इनामदार बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनलअतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. ,उद्योगपती विनोद जाधव म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र ने  महाराष्ट्रात चांगले नाव केले आहे आपल्यासारखे पत्रकारमंडळी देशभरात तयार झाली पाहिजे चॅनलच्या उभारण्यासाठी ल्यापिंग ग्रुपच्या वतीने लागेल ती मदत करू.           आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, अरुण तोडकर मा.सरपंच संदीप नरोळे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पत्रकाराच्या जीवनावरतीआधारित चित्रपट अहम सिनेमा अभिनेता अमीर भाई शेख,अभिनेत्री मृणालीकुलकर्णी हे होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनवणे,राज्य महिला संघटक पंचशिलाताई कुंभारकर,ए एस आय,शैला साळवे मॅडम,ऍड.सुमित सावंत,प्रशांत खरात,मुंबई ठाणेविभाग प्रमुख संदेश भालेराव संपादक भीमसेन उबाळे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सोनवणे सरअंगणवाडी सेविका जि.प व विविध संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, आशा स्वयंसेवीका,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेच विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शन सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केली होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,वलेकर सर यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

पिरळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा

 

पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)  पिरळे तालुका माळशिरस येथे दिनांक 15 जानेवारी 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दलित पॅंथरचेे प्रणेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त  दलित पॅंथर संघटनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिवादन सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ( दलित पॅंथर प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब शिंदे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी केले आहे .

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

You may have missed