पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोमवार दिनांक 17जुलै रोजी सकाळी दहा वाजता जि प शाळा परळी येथे ग्रामपंचायत पिरळे व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था यांचे संयुक्त विद्यमाने *भव्य रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे ब्रिलियंट संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले होते अनेक महिलांनी या शिवण क्लास प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वाटपासोबत रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यातत आले आहे या स्पर्धेसाठी *प्रथम बक्षीस** माझी वसुंधरा सन्मानचिन्ह द्वितीय वक्षिस* माझी वसुंधरा सन्मानचिन्ह तृतीय बक्षिस* माझी वसुंधरा सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीस असून स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम राहतील स्पर्धा नियम* (१) स्पर्धेसाठी रांगोळी स्वतःची आणावी. (२) रांगोळी काढताना त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे (३) रांगोळी काढताना स्वतः चे नाव टाकायचे नाही संयोजक कडून नंबर घेउन टाकायचा. (४) रांगोळीचे बक्षिसाचे नंबर हे तुमच्या रांगोळीतून सामाजिक संदेश, आकृती, रंगरंगोटी कशी आहे यावर अवलंबून असते. यावर तक्रार चालणार नाही. *(५) रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे ** (६) रांगोळी स्पर्धेत कोर्स करणाऱ्या महिलांनी व बाहेरील महिलांनी ही सहभाग घेऊ शकतात. (७) रांगोळी स्पर्धाचे परीक्षक हे बाहेरील असतील. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. दिनांक १७जुलै २०२३वार सोमवार वेळ सकाळी १०.००वाजता* ठिकाण :- जि.प.प्राथमिक शाळा पिरळे* तरी सर्वांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान पिरळे गावचे सरपंच सुनिल दडस, उपसरपंच अमोल शिंदे ,ग्रामसेवक हनुमंत वगरे द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी केले आहे.