पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे असे प्रतिपादन ऍड. डॉ.केवल उके यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्र च्या झाडे लावा झाडे जगवा, माजी वसुंधरा,जलशक्ती बेटी बचाव अभियानांतर्गत.महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध शाळेला आदर्श शाळा पुरस्कार तसेच विविध संस्था आदर्श ग्रामपंचायत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते,अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चॅनलचे संचालक विवाह कायदा मसुदा समिती सदस्य महाराष्ट्र शासन एन डी एम जे राज्य महासचिवडॉ केवल उके म्हणाले की .डॉ.केवल उके बोलताना म्हणाले आम्ही हे छोटस रोपट म्हणून लावलं होतं.आता त्याचा वटवृक्ष होतानाचा दिसतोय पुढे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रची अशाच पद्धतीने प्रगती होत राहील.
माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र चे काम हे उल्लेखनीय आहे.त्यांनी शोध पत्रकारिते सोबत समाज उपयोगी अनेक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवले आहेत त्यांच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवड झाली आहे. हे कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एम के इनामदार, एन डी एम जे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, उद्योजक विनोद जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धवासी आदर्श शिक्षिका कुमारी सविता साळवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी डॉ.एम के इनामदार बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनलअतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. ,उद्योगपती विनोद जाधव म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र ने महाराष्ट्रात चांगले नाव केले आहे आपल्यासारखे पत्रकारमंडळी देशभरात तयार झाली पाहिजे चॅनलच्या उभारण्यासाठी ल्यापिंग ग्रुपच्या वतीने लागेल ती मदत करू. आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, अरुण तोडकर मा.सरपंच संदीप नरोळे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पत्रकाराच्या जीवनावरतीआधारित चित्रपट अहम सिनेमा अभिनेता अमीर भाई शेख,अभिनेत्री मृणालीकुलकर्णी हे होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनवणे,राज्य महिला संघटक पंचशिलाताई कुंभारकर,ए एस आय,शैला साळवे मॅडम,ऍड.सुमित सावंत,प्रशांत खरात,मुंबई ठाणेविभाग प्रमुख संदेश भालेराव संपादक भीमसेन उबाळे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सोनवणे सरअंगणवाडी सेविका जि.प व विविध संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, आशा स्वयंसेवीका,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेच विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शन सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केली होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,वलेकर सर यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके