जिव्हाळा फाउंडेशन च्या वतीने कारूंडे येथे कबड्डी स्पर्धा संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी : जिव्हाळा फाउंडेशन कारुंडे यांच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी कारूंडे ता. माळशिरस जि. सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय खेळ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कारूंडे गावातील व पंचक्रोशी होतकरू खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्धात हेतूने जिव्हाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास दादा पाटोळे यांच्या संकल्पनेतून कारुंडे गावा मध्ये कबड्डी मैदान तयार करण्यास पासून ते स्पर्धेचे संपूर्ण आयोजन पार पाडण्याचा संकल्प केला होता माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाईंजे व एन डी एम जी चे राज्यसचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा भरविण्यात आली होती
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाईंजे एन डी एम जी चे राज्यसचिव वैभव गीते कारूंडे गावचे अमोल पाटील माजी सरपंच अमर पाटील माजी सरपंच हनुमंत पाटील कारुंडे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच जगन्नाथ लोंढे, प्रगतशील शेतकरी विजय मस्कर, पत्रकार प्रमोद शिंदे, अध्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना अध्यक्ष बापू पाटोळे, जिल्हा संघटक रिपाई एस एम गायकवाड एन डी एम जी शहराध्यक्ष गणेश गायकवाड आधी मान्यवरांच्या हस्ते पार पडला स्पर्धेसाठी सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून कबड्डी संघ उपस्थित होते स्पर्धेतील सर्व सामाने रंगतदार व अतिठटीने पार पडले जिव्हाळा फाउंडेशन कबड्डी संघाने प्रशिक्षक आगम यांच्या मार्गदर्शनाखाली नवक्या संघाने अतिशय चुरशीची कडवी प्रेक्षणीय झुंज दिली यावेळी गावातील युवक कबड्डी प्रेमी प्रेषक अबला वृद्ध स्पर्धा संपेपर्यंत उपस्थित राहून आनंद लुटला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये अधिक ट्रॉफी जय हनुमान कबड्डी संघ डोरलेवाडी , द्वितीय क्रमांक दहा हजार अधिक ट्रॉफी एस बी वर्ग स्पोर्ट्स पळसदेव, तृतीय क्रमांक पाच हजार अधिक ट्रॉफी जय हिंद कबड्डी संघ मांडवे व सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा या संघाने पटकाविला प्रत्यक्षात विजेत्या संघास ट्रॉफी युवा उद्योजक माजी सरपंच अमर जगताप कारुंडे यांच्या वतीने देण्यात आली कबड्डी स्पर्धा पार पाडण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास दादा पाटोळे क्रीडा विभाग प्रमुख हनुमंत गायकवाड, सदस्य आबा मसुगडे फाउंडेशन संचलित जिव्हाळा आश्रम अनाथ आश्रम वृद्धाश्रम व्यवस्थापक नाथा गायकवाड व जिव्हाळा कबड्डी संघ मधील सर्व खेळाडू यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली स्पर्धेच्या बक्षीस वितरण त्रिदल सैनिक संघटना सोलापूर अध्यक्ष आढाव, जिल्हा सचिव झोरे व कारूंडे गावचे मेजर अनिल कर्चे उपस्थित होते यावेळी विकास पाटोळे यांनी जिव्हाळा कबड्डी संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची व दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करणार असल्याचे घोषणा केली या स्पर्धा पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा कारूंडे व ग्रामपंचायत कारूंडे कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले