राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्ध कला मार्शल आर्टच्या खेळाडूंचे यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे /प्रतिनिधी: शितोकॉन कराटे असोसिएशन इंडिया आयोजित महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे वानवडी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्धकला मार्शल आर्टच्या खेळाडूनी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमीते क्रीडा प्रकारामध्ये आदित्य लिगाडे – रौप्य पदक , काता क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक, अरिम बोहरा – कांस्य पदक, ईशान लिगाडे -कांस्य पदक, आर्णा अनन्या प्रधान – कांस्य पदक अशी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.
सध्याच्या काळात स्व -संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. आपल्यावर होणाऱ्या आक्रमणावर प्रतिउत्तर देता आले पाहिजे. यासाठी कराटे हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी मोठ्या संख्येने मुली, महिला, मुले मार्शल आर्ट तथा कराटे प्रशिक्षण घेत असतात. युद्ध कला मार्शल आर्ट अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था अल्पावधीमध्ये नावा-रूपाला आल्याचे पहावयास दिसते. या अकॅडमीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मुले,मुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत असतात.
हडपसर, भोसरी, सदुंबरे या पुणे परिसरातील युद्धकला मार्शल आर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके पटकविल्याबद्दल अकॅडमीला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये मिळाली आहे. या खेळाडूंना अविनाश माने सर, संकेत कंद सर, रोहित भालेराव सर यांनी प्रशिक्षण दिले आहे.