कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून प्रा.सुनील साळवे सर यांचे शरद पवार यांना भेटून निवेदन
कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून प्रा.सुनील साळवे सर यांचे शरद पवार यांना भेटून निवेदन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून नातेपुते येथील आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्राध्यापक सुनील साळवे व सहकाऱ्यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी भेटून त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने 0ते20 पट असणाऱ्या जि. प. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वंचित ठिकाणच्या कमी लोकसंख्या असलेल्या गाव,पाडा,वस्ती येथील महाराष्ट्रातील गोरगरिब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे, भटक्या जाती-जमातीतील,आदीवासी समाजातील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यांचा सक्तीचा शैक्षणिक अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे.हे लक्षात घेऊन या निर्णयालाला कडाडून विरोध म्हणून. म्हणून 23-10-2022 रोजी लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळीप्राध्यापक सुनिल साळवे सर, सर्जेराव कांबळे, लखन सोरटे, सौरभ सोरटे, विशाल सोरटेआधी कार्यकर्ते उपस्थित होते.

