Blog

अवैध्य वेश्याव्यवसाय करणारा वर नातेपुते पोलीसांची धडक कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत लॉजच्या नावाखाली महिलांना ठेवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची सपोनि विशाल वायकर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीची गांभीर्याने दखल घेऊन त्याबाबत मा. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग, अकलूज यांना माहिती देण्यात आली.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली मा. विशाल नवले, परि पोलीस उपअधीक्षक यांनी सदर कारवाईचे नियोजन केले त्यानुसार डमी ग्राहक उपलब्ध करून सदर ठिकाणी आम्ही तसेच मा. विशाल नवले, परि पोलीस उपअधीक्षक, पंच व पोलीस स्टाफ असे रवाना झाले. सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर डमी ग्राहक यांना लॉजमध्ये पाठविण्यात आले. लॉजमध्ये दोन इसम बसलेले होते तेव्हा त्यांनी सदर डमी ग्राहकास वैशागमन करीता पैसे मागीतले व डमी ग्राहकाने त्याला पैसे दिले तेव्हा त्यांनी ते आपआपसात वाटुन घेतले व डमी ग्राहकास वर जा असे सांगीतले सदर व्यवहार झाल्याचे खात्री होताच डमी ग्राहकाणे सापळा कारवाई करीता तैनात असलेल्या पोलीस स्टाफ व पंचाना ठरल्याप्रमाणे इशारा केला त्यानंतर सापळा कारवाई करीता तैनात असलेल्या पोलीस स्टाफने तत्काळ लॉज मधील आरोपीना रंगेहात पकडले तसेच पिडित महिलेची सुटका केली.
तरी दिनांक २३/०९/२०२६ रोजी रात्री सुमारे २१.०० वाजता, नातेपुते गावच्या हद्दीतील शिंगणापूर पाटीजवळ, नातेपुते-फलटण जुन्या रोडलगत असलेल्या हॉटेल आरव लॉज येथे पोलिसांनी कारवाई केली. सदर लॉजच्या पहिल्या मजल्यावरील पश्चिम बाजूकडील रूम नं. १ मध्ये आरोपी इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेस पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना उपलब्ध करून देत असल्याचे तपासात निष्पण झाले आहे. त्या पैशानवर आरोपी १. राहुल लालासो पांढरे, वय २८ वर्षे, रा. नातेपुते, ता. माळशिरस २. राज विनोद मल्लीक, रा. कोळकी, फलटण, ता. फलटण हे त्यांचे उदरनिर्वाह चालवत आहे.
तसेच, सदर लॉजमधील खोल्यांचा वापर वेश्याव्यवसायासाठी होत असल्याची माहिती असतानाही त्या खोल्या त्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं. ३६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी :- १. राहुल लालासो पांढरे, वय २८ वर्षे, रा. नातेपुते, ता. माळशिरस २. राज विनोद मल्लीक, रा. कोळकी, फलटण, ता. फलटण ३. दीपक विकास बोडरे, रा. फोंडशिरस, ता. माळशिरस पीडित महिला – ०१
सदर तपासा दरम्यान आरोपी नं १ व २ हे सदर अनैतिक व्यवसायातुन मिळणा-या पैशांवर उदरनिर्वाह करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाई मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. प्रेरणा कट्टे, पोलीस उपअधीक्षक, पंढरपूर विभाग आणि मा. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग, अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच मा. विशाल नवले, परि पोलीस उपअधीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे व विशाल वायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलीस ठाणे यांच्या सोबत हि कारवाई पोसई महादेव पिसाळ, मपोसई सोनल मोरे, पोसई गळवे, पोहेका / धनाजी शेळके, पोहेकॉ मनोज करडे, पोकों / मनोज शिंदे, पोकों / रणजीत मदने, पोकों / सचिन चव्हाण, पोकों / राहुल वाघमोडे, मपोकों / नेहा बोंदर व मपोकों / सीमा सोनवणे सदर कारवाई सामिल होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी विशाल वायकर, नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहेत.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अनैतिक व्यापार व कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारांविरुद्ध यापुढेही कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

स्टेटसच्या दुनियेपलीकडचा माझा ‘बाप’: एक जिवंत आणि पवित्र सेवा पर्व..

आज ‘फादर्स डे’… सोशल मीडिया उघडला की प्रत्येक कोपऱ्यात वडिलांबद्दलच्या कविता, फोटो आणि भावुक स्टेटसचा पूर आलाय. पण हे स्टेटस पाहताना मनात एक वेगळीच हुरहूर आणि काही अंशी खंत निर्माण होते. आज समाजातील एक वास्तव प्रकर्षाने समोर येतं—काही लोक म्हातारपणी, आजारपणात आपल्या आई-वडिलांकडे साधे ढुंकूनही पाहत नाहीत, पण आजच्या दिवशी मात्र फेसबुक, व्हॉट्सॲपवर ‘माझा बाप, माझा कणा’ म्हणत स्टेटस ठेवण्यात आघाडीवर असतात.अशा दिखाऊ दुनियेत मला माझ्या वडिलांची आणि आम्ही त्यांच्यासाठी घेतलेल्या अहो रात्र 24 तासांच्या अखंड पहाऱ्याची प्रकर्षाने आठवण येते.माझ्या वडिलांना जेव्हा ब्रेन स्ट्रोक चा (अटॅक) आला, तेव्हा आमचं जगच बदलून गेलं. जसे की  या काही वेदनादायी आठवणींमध्ये कैद आहे, एकाएकी नियतीने आमची कुटुंबाची मोठी परीक्षा घेतली.ते सलग एक महिना कोमात होते.मृत्यूशी झुंज देत ते पाच ते सहा महिने अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलच्या खाटेवर पडून होते.त्या सहा महिन्यांच्या असह्य संघर्षानंतर जेव्हा आम्ही त्यांना घरी आणलं,तेव्हा त्यांचं शरीर थकलेलं होतं, त्यांना स्वतःला काहीच करता येत नव्हतं.तिथून पुढे सुरू झाला आमच्या भक्तीचा आणि सेवेचा खरा प्रवास. तब्बल दोन वर्ष आम्ही भावंड आई पत्नी भाचा अहोरात्र, क्षण न् क्षण त्यांची सेवा केली.ज्या बापाने बोट धरून जगायचं शिकवलं, त्याच बापाची नवजात बालकासारखी काळजी घेण्याची वेळ आमच्यावर आली होती.सकाळी उठून त्यांचे दात घासण्यापासून, त्यांना  आंघोळ घालण्यापर्यंत, त्यांची स्वच्छता राखण्यापासून ते खाऊ घालन वेळच्या वेळी औषधोपचार करण्यापर्यंत  सर्वकाही आम्ही स्वतः करत होतो.यात कसलाही कंटाळा नव्हता, की कसलीही सक्ती नव्हती; होतं ते फक्त आणि फक्त आपल्या वडिलांप्रती असलेलं  प्रेम कर्तव्य आणि कृतज्ञता.आज जेव्हा लोक पालकांच्या जिवंतपणी त्यांच्या सुखाची, त्यांच्या आरोग्याची साधी चौकशीही करत नाहीत आणि वर्षातून एकदा स्टेटस ठेवून मोकळे होतात, तेव्हा मला माझ्या त्या दोन वर्षांच्या सेवेचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही कधी सोशल मीडियावर वडिलांचे कौतुक करणारे मोठे मोकळे संदेश नाही ठेवले, पण त्यांच्या पडत्या काळात सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो.बापाची खरी सेवा ही २४ तासांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये नसते, तर त्यांच्या म्हातारपणात,आजारपणात आणि असहाय्यतेत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यात असते. ज्या हातांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या हातांना कधीही थरथरू न देणं, हाच खरा ‘फादर्स डे’ आहे.आज वडिलांची आठवण येताना डोळे नक्कीच पाणावले आहेत, पण मनात एकच समाधान आहे. की “दादा, जोपर्यंत तुम्ही होतात, तोपर्यंत तुमच्या सेवेत आम्ही कोणतीही कसर सोडली नाही.तुम्ही आमच्या मनात कालही होतात, आजही आहात आणि चिरंतर राहाल!”वडील जिवंत होते तेव्हाच ते आम्ही सामाजिक काम केलं आणि त्याची बातमी किंवा प्रसिद्धी झाली तर त्याचे कात्रण घेऊन जपून ठेवत असत कधी समोर नाही परंतु पाठीमागे माझ्याकडे भेटायला आल्यानंतर वाटत माझा एखादा मित्र भेटला तर सांगायचे साहेबाला भेटायला आलो होतो आमचं यश पाहून बापाची छाती गर्वाने फुगायची. सेवार्थ करायचा असेल तर जिवंतपणीच करावा. गेल्यावर मासिक जेवण घालून व श्रद्धाचे मोठे जेवण घालून काही उपयोग नाही.सर्व खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा करणाऱ्या लेकरांना आणि पितृत्वाला मानाचा मुजरा!

शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने दहिवडीत 10 एप्रिलला भव्य मोफत आरोग्य शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दहिवडी (ता. मान, जि. सातारा) येथे शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट पुणे आणि सेवासदन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी व उपचार मोफत करण्यात येणार असून, नागरिकांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. शिबिरात मोफत चष्मे वाटप, हृदयरोग तपासणी, ईसीजी, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध असतील. तसेच डोळ्यांशी संबंधित तिरळेपणा, बुबूळ प्रत्यारोपण, रेटिना व पापणी पडण्याचे आजार यांची तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
याशिवाय लघवी, किडनी, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित आजारांवर उपचार, मोफत रक्त तपासणी, मनका व मज्जातंतू विकारांवर शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया तसेच कॅन्सर तपासणी मोफत करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर आयडियल गणेश मंडळ, चावडी चौक, दहिवडी येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मनोरंजनातून महिला सक्षमीकरण – शिवप्रसाद उद्योग समूहाचा अभिनव उपक्रम!

माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना मनोरंजनासोबत आर्थिक सक्षमीकरणाची जोड देणारा अनोखा उपक्रम शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ’ या लोकप्रिय संकल्पनेतून महिलांना दुग्ध व्यवसायात प्रगतीची दिशा दाखवण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात येत आहे.
तालुक्यातील मांडवे येथे आयोजित करण्यात आलेल्या या रंगतदार कार्यक्रमात गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनाच्या वातावरणात महिलांना व्यवसायिक मार्गदर्शन देण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन सौ. ऋतुजाताई शरद मोरे, शिवप्रसाद मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ. अश्विनीताई रमेश मोरे तसेच एस पी जी इन्शुरन्स अँड ब्रोकिंग प्रा. लि.च्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. प्रियंका ताई वैभव मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. शिवप्रसाद उद्योग समूहाच्या सहकार्याने दूध संकलन, गुणवत्ता तपासणी, बाजारपेठ उपलब्धता आणि योग्य दर याबाबत महिलांना सक्षम बनवले जात आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून दिलेले हे मार्गदर्शन महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

दुग्ध व्यवसायात आधुनिक क्रांतीसाठी ‘शिवप्रसाद’ खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – शरद (बापू )मोरे

​कारुंडे येथे ‘जनहित जागर मेळावा’ उत्साहात; सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधींचे आवाहन
​पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी):
बदलत्या काळात दुग्ध व्यवसाय केवळ जोडधंदा न राहता तो आधुनिक पद्धतीने करून पूर्णतः फायद्यात आणणे शक्य आहे. यासाठी शिवप्रसाद दूध संघ, शिवप्रसाद अर्बन बँक आणि एस.पी.जी. मल्टीस्टेटच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सर्वतोपरी आर्थिक व तांत्रिक पाठबळ देण्यास आमचा समूह कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शरद बापू मोरे यांनी केले.
​माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथे स्थानिक सेंटर चालकांच्या वतीने आयोजित ‘जनहित जागर मेळाव्या’त ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.​शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक सक्षमतेची साथ​मेळाव्याला संबोधित करताना शरद बापू मोरे म्हणाले की, “शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुग्ध व्यवसाय नक्कीच नफा मिळवून देणारा ठरेल. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी शिवप्रसाद अर्बन व एस.पी.जी. मल्टीस्टेटच्या माध्यमातून कर्जपुरवठा आणि भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. शिवप्रसाद दूध संघ केवळ दूध संकलन न करता, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम सोबत राहील.”
​ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवप्रसाद उद्योग समूहाने विशेष पाऊल उचलले आहे. यामध्ये:
​दुग्ध व्यवसाय: तरुणांना स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन.
​इलेक्ट्रिक दूध वाहतूक गाड्या: पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी तरुणांना वाहन उपलब्ध करून देणे.
​विविध रोजगार संधी: समूहाच्या अंतर्गत इतर उपक्रमांतून रोजगाराची उपलब्धता.
​”तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे आणि शिवप्रसाद समूहाने उपलब्ध करून दिलेल्या या संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे,” असे आवाहनही श्री.शरद(बापू )मोरे यांनी यावेळी केले.
​कारुंडे येथील सेंटर चालकांनी या मेळाव्याचे नेटके नियोजन केले होते. शासनाच्या व समूहाच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने हा जागर मेळावा घेण्यात आला. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






                    

पुरंदावडे येथे भव्य ‘देवाभाऊ केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन

आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रंगणार भव्य ओपन मैदान

नातेपुते (प्रतिनिधी):

माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरंदावडे-सदाशिवनगर येथे भव्य ‘देवाभाऊ केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, रविवार दि. ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या शर्यतीला प्रारंभ होणार असून, सोलापूर जिल्ह्यातील हे एक मोठे ‘ओपन मैदान’ ठरणार आहे.श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे-सदाशिवनगर यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. पुरंदावडे येथील नवीन पालखी मैदानावर या शर्यती पार पडतील. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान पूर्णपणे रितसर असून, कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही, अशी ग्वाही आयोजकांनी दिली आहे.लाखोंची बक्षिसे आणि मानाची गदाया स्पर्धेत सात क्रमांकापर्यंत रोख रकमेची मोठी बक्षिसे आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहेत: * प्रथम क्रमांक: २,००,००१ रुपये व सन्मानचिन्ह * द्वितीय क्रमांक: १,५०,००१ रुपये व सन्मानचिन्ह * तृतीय क्रमांक: १,००,००१ रुपये व सन्मानचिन्ह * चतुर्थ क्रमांक: ७०,००१ रुपये व सन्मानचिन्ह * पाचवा ते सातवा क्रमांक: अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपये.तसेच सेमी फायनलमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गाड्यांनाही विशेष रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.शिस्तबद्ध नियोजन आणि नियमअखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या नियमांनुसार ही स्पर्धा पार पडणार आहे. बैलांना मारहाण करण्यास सक्त मनाई असून, बैलांचे फोटो फिटनेस प्रमाणपत्र आणि बैल मालकाचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरीची विशेष सोय करण्यात आली असून, मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून सुनील मोरे (पेडगाव), प्रताप झांजुर्णे (तडवळे), विकास जगदाळे आणि संपत वाघमोडे हे काम पाहणार आहेत. तर झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनावडे आणि पप्पू मंडले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या भव्य आयोजनामुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, ‘देवाभाऊ केसरी’चा किताब कोणता बैलगाडा पटकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कलिंगडाचे दर कोसळले; बळीराजा रडकुंडीला! युद्धाच्या भडक्याने फळ उत्पादक शेतकरी संकटात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे कलिंगड आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आभाळ फाटले आहे. अवघ्या १० दिवसांत कलिंगडाचे दर ४० रुपयांवरून थेट १० ते १५ रुपयांवर कोसळल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

शेतकऱ्यांची बिकट अवस्था:

निर्यात ठप्प झाल्यामुळे करमाळा व माढा भागातील १ हजार मेट्रिक टन केळीचा साठा पडून आहे, तर ३०० कंटेनर बंदरात अडकले आहेत. निसर्गाच्या लहरीपणातून वाचवलेले पीक आता युद्धाच्या आणि कोसळलेल्या दरांच्या कचाट्यात सापडले आहे.

व्यापारी कंपन्यांकडून फसवणूक आणि आर्थिक कोंडी:

या भीषण परिस्थितीत स्टार एम्पायर प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सलमान काझी आणि इतर प्रमुख व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला उठाव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॅप्पी ग्रीन (नारायणगाव) आणि जीएस ॲग्रो या फळ व्यापारी कंपन्यांनी, तसेच  वाजिद काझी ट्रान्सपोर्ट (मंगळवेढा) याने फसवणुकीचे ‘कथाकथन’ रचून या साखळीत खोडा घातला घातल्याचा आरोप सलमान काझी यांनी केले बोलताना ते म्हणाले की या फसवणूक करणाऱ्यांवर आता एफआयआर (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्याची सर्व कायदेशीर बाजू  ॲड सैफली मुबई हायकोर्ट, अब्दुलझीझ, ॲड आशिष मोरे पंढरपूर हे बघत आहेत

प्रमुख व्यापाऱ्यांनी मांडली व्यथा: सदरील कठीण प्रसंगी या प्रकरणात कळमन गावातील शिक्षक आणि शेतकरी श्री.सादिक मुलानी,मुटकुळे, शिरगार अशा सर्व शेतकऱ्यांनी STAR EXPORT ला भरपूर सहकार्य केले आहे.

या कठीण प्रसंगी डायरेक्टर सलमान काझी यांच्यासोबत अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली आहे त्यात 

शुभम लांडगे-शिवांश इलेक्ट्रिक 

 विजय सदाशिव बराडकर (ॲग्री गोल्ड फ्रेश हार्वेस्ट)

 अरबाज शेख (स्टार फ्रेश फ्रुट)

  रिजवान बागवान (रिजवान फ्रुट)

 अनीस बागवान (अर्शालन फ्रुट)

 यासिन नदाफ (इफ्ता फ्रुट)

 मुदस्सर (मुदस्सर फ्रुट तुळजापूर)

योगेश लांडगे (शिव फ्रुट)

असीम काझी (काझी फॅब्रिक)

सलमान काझी( Director/founder Star empire pvt.ltd)

दहिगाव गट दत्तक घेतोय पालकमंत्री जयकुमार गोरे 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दहिगाव तालुका माळशिरस येथे मा.आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते ह्या दहिगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील दत्तात्रय शेळके यांच्या प्रचारा साठी दहिगाव येथे ग्रामविकास तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रचारासाठी आले असता प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की संस्कृती सातपुते या माझ्या बहिण आहेत आणि या बहिणीसाठी दहिगाव गट हा मी विकास कामांसाठी दत्तक घेत आहे.ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून दहिगाव येथील सगळी विकास कामे केली जातील तसेच बोलताना पुढे ते म्हणाले की राम सातपुते हा कामाचा माणूस आहे. राम सातपुते आमदार नसल्यामुळे माळशिरस तालुक्याचे पाचशे ते सहाशे कोटींचे नुकसान झाले आहे.अद्याप पर्यंत एक ही रुपयाचे काम उत्तम जानकर यांना करता आलं नाही दहीगाव साठी मी खास पॅकेज देणार आहे.दहिगाव गटाची निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मोहिते पाटील यांच्यावर सुद्धा पालकमंत्री गोरे यांनी टीका केली. ते म्हणाले की शिवरत्न वर पोत्याने पैसा गेला लोक भिकेला लागली राम सातपुते ला पराभूत करायला आमदार आणि खासदार एकत्र झालेत आता या दोघांचा पराभव करायची संधी आली आहे आता घावलय सोडू नका अशी जळजळीत टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळी मा.आमदार राम सातपुते,संस्कृती सातपुते, शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद मोरे, किशोर सुळ,सत्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बाबाराजे देशमुख,प्रकाश पाटील श्रीलेखा पाटील, ऋतुजाताई मोरे,दत्तात्रय शेळके,बाजीराव काटकर,भीमराव फुले तसेच भाजपचे पंचक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारो हातांना बळ देणारा आधारवड सतीश तात्या ढेकळे आज नियतीशी झुंजदेतोय


सामाजिक कार्यकर्ते सतीश ढेकळे यांच्यासाठी शेकडो लोकांचे परमेश्वर रुपी डॉक्टरांकडे साकडे 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते – प्रमोद शिंदे
ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ समाजहित जोपासले, ज्यांच्या दारातून कोणीही गरजू कधीच रिकाम्या हाताने परतला नाही, असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि निस्पृह सामाजिक कार्यकर्ते सतीश तात्या ढेकळे आज नियतीशी झुंज देत आहेत 11 नोव्हेंबर 2025 रोजी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे दुर्दैवाने ते सध्या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये कोमात असून त्यांच्या या प्रकृतीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश ढेकळे म्हणजे माणुसकीचा झरा असणार व्यक्तिमत्व आज 10 जानेवारी त्यांचा वाढदिवस असूनसतीश ढेकळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.गोरगरीब मुलांचे शिक्षण असो,एखाद्या गरजूचे तातडीचे ऑपरेशन असो किंवा कोणाच्या घरातील अन्नाचा प्रश्न; सतीश भाऊ नेहमीच ‘देवदूता’सारखे गरजूंच्या मदतीला धावून गेले आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा आठवडाभर त्यांचा वाढदिवस सप्ताहा म्हणून साजरा होत असतो.एकशिव ,कळंबोली ,बांगार्डे ,पिरळे, कुरबावी ,डोंबाळवाडी , शिंदेवाडी पळसमंडळे किंवा संपूर्ण नातेपुते परिसरात प्रत्येक गावात गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात ,वाड्या वस्ती वरती सतीश ढेकळे यांचा वाढदिवस साजरा होत आला आहे. त्याचं कारण वरील प्रत्येक गावामध्ये अनेक व्यक्तींना रस्ते पाणी सारख्या समस्या स्वखर्चाने सोडवले आहेत. त्यांचे शिक्षण  प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे नववीपर्यंत झाले असून त्यांची संघर्षमय जीवनगाथा आहे घरच्या परिस्थितीमुळे 15 व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून काम शोधण्यासाठी पुण्याला जावं लागले.पुण्याला गेल्यानंतर पहिले दोन दिवस उपाशी राहून इतर ठिकाणी काम करून वडापाव वर भूक भागवून पेंटिंग चे काम सुरू केले हळूहळू इतर मित्रांच्या मदतीने ग्रुप बनवून कंत्राटी पद्धतीने पेंटिंगची कामे घेऊ लागले पाच सहा वर्षात दिवस रात्र मेहनत करून कामाची पद्धत शिकून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले व पुण्यासारख्या ठिकाणी सामाजिक कार्याच्या जोरावर नगरसेवक महापौर उद्योजक राजकीय नेते मंडळी यांच्याशी जवळीक साधून उद्योग भरारी घेत यशस्वी उद्योजक झाल्यानंतर गावाकडे सामाजिक कार्य सुरू केले 2000 युवकांना रोजगार मिळवून दिला अनेकांना व्यवसायात मदतीचा हात देऊन मदत केली हजारो युवकांचे वाढदिवस त्यांच्या माध्यमातून साजरे होत असतात.क्रिकेट स्पर्धा,बैलगाडी शर्यत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटपआरोग्य शिबिर,मोफत बोरवेल,विहिरी खोदून देणे निस्वार्थपणे लाखो रुपयांची कामे करत असे अनेक उपक्रम सतीश ढेकळे यांच्या माध्यमातून राबवले जात होते.परंतु आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एकशिव व परिसरातील गावातील युवक नागरिक यांच्या वतीने परमेश्वराला प्रकृतीसाठी साकड घालण्यात येत आहे.

शाळकरी मुले पळवून नेण्याच्या चुकीच्या बातम्या व अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये -एपीआय महारुद्र परजणे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक ०१/०१/२०२६ रोजी काही वृत्तपत्रामध्ये मौजे मांडवे येथील रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील शाळा मांडवे येथील एका ३ री मधील मुलाला चॉकलेट चे आमिष देवुन ओमिणी गाडीतुन पळवुन नेण्याचा प्रयत्न झाले बाबतची बातमी प्रसिध्द करण्यात आले होते.त्याबाबत पोलीस ठाणेमध्ये कोणतीही लेखी तक्रार प्राप्त नाही. सदर बातमीच्या अनुषंगाने सोशल मिडीयावरून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत असल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे निरीक्षक महारुद्र परजने प्रभारी अधिकारी नातेपुते पोलीस ठाणे, पोहेकॉ/१७६५ गोरे व पोकों/ ०६ देशमुख व मांडवे गावचे पोलीस पाटील नितीन सोनटक्के असे दिनांक ०२/०१/२०२६ रोजी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील शाळा मांडवे येथे प्रत्यक्षात जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर सह शिक्षक व शिक्षीका यांचेकडे घडले प्रकाराबाबत चौकशी केली असता. शाळेतील ज्या मुलाचे बाबतीत असा प्रकार घडल्याचे कळविण्यातआले होते त्याला शाळेतील शिक्षकांचे समवेत विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदर मुलाचे सांगण्यामध्ये तफावत असल्याचे लक्षात आले आहे.त्यानंतर पोलिसांनी शाळेतील शिक्षकांची भेट घेवुन त्यांना अशी कोणतीही घटना घडल्यास आपण तात्काळ नातेपुते पोलीसांशी संपर्क करावा तसेच अशी कोणतीही घटना असल्यास त्याबाबत खात्री करूनच त्याची माहिती सोशल मिडीया, प्रिंट मिडीया व गावातील लोकांना कळवावी असे सांगितले आहे. तरी सदरची घटनेमध्ये विसंगती आढळून आलेली आहे. अशा प्रकारे मागील ०२ दिवसापासुन सोशल मिडीयावर जे वृत प्रसारित होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये भितीचे वातावरण परण्याची शक्यता आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत सोडताना योग्य ती दक्षता घ्यावी. नातेपुते पोलीसांमार्फत सर्व शाळांना भेटी देवून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे सदर अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या व आपण वर विश्वास ठेवू नये. तसेच सदर घटनेबाबत कोणीही घाबरून जावु नये असे अवाहन करण्यात येत आहे.पोलीसांकडुन योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. अशी माहिती नातेपुते पोलिसांकडून देण्यात आली