धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब शिंदे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पिरळे तालुका माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष समाज रत्न स्व.मानसिंगराव उर्फ आबासाहेब शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन दादासाहेब मानसिंगराव शिंदे यांची निवड माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष,आनंद बनसोडे प्रदेशाध्यक्ष,ज्ञानेश्वरपरदेसी प्रदेश सचिव यांच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवडीने महाराष्ट्रातील अनेक वर्ष मागास असलेला धनगर समाज यांच्या आरक्षण मिळवून देण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमुख भूमिका साकारतील अशी अपेक्षा संघटनेने दादासाहेब शिंदे यांच्याकडून बाळगलेली आहे.सदर निवडीने पिरळे व परिसरातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे.