खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
मुलांच्या शिक्षणासासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी वैभवजी गिते यांनी घेतली.
पीडित कुटुंबाच्या शेवटपर्यंत पाठीशी राहू.. विकास दादा धाइंजे.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज न्यूज नेटवर्क अकलूज —
मौजे खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथे दिनांक 1 मे 2020 रोजी मातंग समाजातील
रामचंद्र विठ्ठल खंडागळे या तरुणाचा खुन झाला.
या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकासदादा धाइंजे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खंडाळी येथे भेट दिली.
खंडागळे कुटुंबाचे सांत्वन केले
मयत रामचंद्र खंडागळे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत.एक भाऊ मतिमंद आहे.ही परिस्थिती लक्षात घेता वैभवजी गिते यांनी दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसह कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याची घोषणा घटनास्थळीच केली.तात्काळ समाजकल्याण व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून पीडित कुटुंबास तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेत तीनही आरोपींना अटक केली असून आरोपी सध्या पोलीस कास्टडीमध्ये आहेत.विकासदादा धाइंजे यांनी कुटुंबास केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले.व तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीची मदत,पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी एन.डी.एम.जे चे नेते बाबासाहेब सोनवणे, भगवान भोसले,दत्ता कांबळे,समीर नावगिरे,वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र साळवे,कल्याण लांडगे
खंडाळीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव साबळे
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे,
आबा वाघमारे,
योगेश खंडागळे, सौरभ वाघमारे अभय वाघमारे,प्रवीण खरात, प्रकाश खरात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव गिते व विकास दादा यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबास कागदपत्रे काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली.