पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे( नातेपुते)- पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार असल्याची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी एम जे) या संघटनेने ग्रामसेवक डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमाणे पत्रकारांनाही 50 लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती पत्रकार हा स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतो व सत्य परिस्थिती आढावा वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचत असतो परंतु हे काम करत असताना पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नव्हते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून इतर कर्मचाऱ्यांना बरोबर पत्रकारांनाही कोरोना धोका आहे. त्यांनाही विमासंरक्षण मिळाले पाहिजे. मुंबईमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाआहे ही गोष्ट लक्षात घेत यावर आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे,पत्रकार प्रशांत खरात यांनी 50 लाख रुपयांचा विमा पत्रकारांना देण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार याची घोषणा केली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे व त्याला कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्यास तात्काळ हे 50 लाखाचे विमा संरक्षण मिळणारआहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व पत्रकार बांधवांकडून स्वागत केले जात आहे.