कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*
कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -( प्रमोद शिंदे)- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी 15 जून 2020 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे.
आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने आश्वासने देऊन शासनामार्फत व प्रशासनामार्फत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली ,कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड-१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला आहे. कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत असतांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, शासनाने समान काम समान वेतन याची घोषणा केली आहे परंतु यावर शासनाने कसल्याही प्रकारचे वेतन वाढ कर्मचाऱ्यांना दिली नाही .शासनाला आमची गरज नसल्यास, आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसुन येत आहे.
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १७००० रिक्त पदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे मा. आरोग्यमंत्री साहेबांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळली आहे. पत्र संदर्भ क्र ४ व ५ नुसार राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतलेली नसल्यामुळे दि.१५/०६/२०२० पर्यंत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी दि.१५ जुन २०२० पासुन महासंघाकडुन राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच या आंदोलनात जे काही नुकसान होईल यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन शासनाला कंत्राटीी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष नंदू कासार व संघटने च्या पदाधिकारी यांनी दिले आहे .शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभरातून करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.