माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

*माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप* 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) – माळशिरस  नालंदा बुद्ध विहार  येथे  भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच भिम शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिध्दार्थनगर येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धांईजे यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील शाहीर लोक कलावंत  यांना  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले. हे वाटप राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर तसेच आंबेङकरी चळवळीच्या कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उत्तमराव जानकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोककलावंत शाहीर यांनी स्वरचित कोणावरती व  भीम गीते सादर करून शाहिरी जलसा सादर केला यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, पांडुरंगतात्या वाघमोङे जेष्ठ नेते अशोकबापु धाईजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट,माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत,नगरसेवक भगवान थोरात,विशाल साळवे,रणजीत कसबे ,प्रदिप धाईजे,लोकशाहिर जितेंद  धाईजे, रणजित धाईजे,बाळु काटे,किरण धाईजे, तसेच माळशिरस तालुक्यातील  लोककलावंत शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष किशोर धाईजे,युवक अध्यक्ष बुध्दभूषण धाईजे ,बुध्दभूषण बनसोङे, अतुल धाईजे  अनिल धाईजे यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे आयोजन विकास दादा धाइजे यांनी केले होते तसेच हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करून करण्यात आला.