कोरोना अमृत व्यक्तीवर स्वतःतहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले अंत्यसंस्कार

कोरोना अमृत व्यक्तीवर स्वतःतहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले अंत्यसंस्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)इंदापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून त्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोना covid-19 ने मृत्यु झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली यावर इंदापूर तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ.सोनाली मेटकरी मॅडम यांनी स्वतः रात्री एक वाजता स्मशानभूमी मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांच्या सोबत त्या मृत व्यक्ती वरती अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तिच्या नातेवाईकांचा मॅडमचे आभार मानण्यासाठी फोन आला असता त्यांचा चांगला समाचार तहसीलदार मेटकरी मॅडम यांनी घेतला.
याअगोदर गेल्यावर्षी चिखली येथील निरा नदी पात्रात सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी येथील इसम पाण्याच्या पुरात अडकली होती. तेव्हा देखील तत्परता दाखवून तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम यांनी पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या सहकार्याने यंत्रणा लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले होते.या कोरोना काळातही चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळून आपले कर्तव्य चोख बजावल्यामुळे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोना मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांनी संदेश दिला की PPE किट घालून मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करावेत PPE कीट घातल्यानंतर कसल्याही प्रकारचा धोका नाही स्वतःच्या नातेवाईकाचा अंत्यसंस्कार केल्यानंतर समाधान वाटते त्यांनी प्रशासनासोबत येऊन यात सहभागी व्हावे. यामुळे प्रशासनाचा भार ही कमी होईल.