शाळेत पोक्सो ई बाॅक्स व तक्रारपेट्या न बसवल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांवर होणार कारवाई

शाळेत पोक्सो ई बाॅक्स व तक्रारपेट्या न बसवल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांवर होणार कारवाई

शिक्षणाधिकारी कुंभार यांनी मागितला‌ अहवाल; अजिनाथ राऊतांनी एनडीएमजेच्या पाठपुराव्याला यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जवळा – प्रतिनिधी दि.२४

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसह बालकांवर अन्याय अत्याचार होऊ नयेत आणि जर झालेच तर त्यांना लगेच आॅनलाईन तक्रार करता यावी यासाठी सर्व शाळांमध्ये पोस्को ई बॉक्स व तक्रारपेट्या बसवण्याची मागणी एन.डी.एम.जे. संघपणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी संघटणेच्या वतीने वारंवार करुन पाठपुरावा केला होता त्या केलेल्या प्रयत्नास अखेर यश आले आहे.
सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकानुसार बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार कोठे करायची याची माहिती नसल्यामुळे आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कोणाकडे त्याची वाच्यता करू शकत नाही परिणामी अशा प्रसंगांना त्यांना वारंवार बळी पडावे लागते या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या तक्रारीसाठी www.ncpcr.gov.inया वेबसाईटवर पोस्को ई बॉक्स तयार केलेला असून त्यावर प्रेस केल्यास सदर तक्रार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे जाते तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 5 मे 2017 च्या पत्रिका परिपत्रकानुसार सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिंनीवर होणारे अन्याय अत्याचार भेदभावाचे प्रकार वाढत आहेत तसेच असे प्रकार दबुन राहत आहेत.
म्हणुन कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थी, विद्यार्थिंनी‌ व बालकांवर होऊ नयेत आणि जर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार झालेच तर विद्यार्थ्यांना त्याची आॅनलाईन तक्रार करता यावी यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी गेली एक वर्षापासुन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी जिल्हापरिषद, कार्यालय उस्मानाबाद यांचेकडे वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार पाठपुरावा केला होता याची गट शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार (प्रा) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, भुम, परांडा, वाशी, यांना दि. 29/07/2020 रोजी लेखी पत्र पाठवून या निवेदनावर तात्काळ अद्याप केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पोस्को ई बॉक्स व तक्रार पेट्या बसवल्या कि कसे? याचा अहवाल मागवला आहे तसेच पोक्सो ई बॉक्स व तक्रार पेट्या न बसवणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोषी धरुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

You may have missed