नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

 *नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

नातेपुते (प्रमोद शिंदे) माळशिरस विधानसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात तयार आहेत परंतु समोर विरोधात पैलवान लढायला तयार नाहीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणूक चालू असताना बँकॉक ला फिरायला गेलेत राष्ट्रवादीची परिस्थिती अशी झाली आहे की आधे इधर जावो आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे अशी झाली आहे .सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक होण्याअगोदर हार मानली आहे त्यांनी जाहीरनाम्यात अवास्तव आश्वासने दिली आहेत परंतु वीस ते पंचवीस वर्ष मोदी ना कोणीही  हरवू शकत नाही. पंधरा वर्ष  काँग्रेस आणि राष्ट्रवादी  यांनी जनतेची दिशाभूल केली आहे पंधरा वर्षात त्यांनी केलेले काम  आणि आम्ही केलेल्या कामाची तुलना करा पाच वर्षात आमच्या वरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही  अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी व काँग्रेस वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सिंह मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आम्ही नातेपुते  महाळुंग अकलूज  नगरपंचायत झाली पाहिजे  याची मागणी केली होती  त्याचा मन दूर झाले आहे माळशिरस तालुक्यात विकासासाठी फडणवीस साहेबांनी भरपूर निधी दिला आहे तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना झाली पाहिजे  याचा पाठपुरावा  अनेक दिवसांपासून दादा करीत आहे  ते झाले पाहिजे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या आहेत . उमेदवार राम सातपुते  म्हणाली की  विजय दादांचे विकास रेषा  पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन तसेच राष्ट्रवादीचे आभाळ फाटले आहे ठिगळ कुठे कुठे लावायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे ते बोलत होते. या सभेसाठी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,रणजितसिंह मोहिते पाटील आर पी आय चे  महात्मा फुले विकास महामंडळ अध्यक्ष  राजाभाऊ सरवदे, मदनसिंह मोहिते पाटील, खासदार रणाजितसिंह निंबाळकर, शिवामृत चे  चेअरमन धैर्यशील भैया मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख ,सरपंच भानुदास राऊत ,हनुमंत सुळ किशोर सुळ ,मामासाहेब पांढरे, माऊली पाटील, पांडुरंग देशमुख ,तसेच भाजप व महायुतीतील अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरगर यांनी केले.

You may have missed