स्वबळावर सत्ता मिळविणे कठीण असल्याने युती करून सत्तेत सहभागाचा मार्ग योग्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 12 – महाराष्ट्रात स्वबळावर 145 आमदार निवडून आणून सत्ता मिळविणे आता कठीण आहे. त्यामुळे युती करून सत्तेत सहभाग घेऊन सत्तेचा समाजाचे प्रश्न सोडविणे; समाजाला लाभ मिळवून देणे हाच मार्ग योग्य असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. भारतीय राज्यघटने चे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही चालवीत आहोत. अनेकांनी रिपब्लिकन नाव पुसुन टाकले आहे.आम्ही मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसू देणार नाही आणि कधीही मिटू देणार नाही असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी वडाळा रमा माता नगर येथे केले.रिपाइं चे मुंबई प्रदेश सचिव बाबा काळे यांच्या प्रयत्नातून वडाळा येथील रमामाता नगरमध्ये अपंग दिव्यांग वृद्धांसाठी व्हीलचेयर चे मोफत वाटप आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; दुर्गा साबळे; गौतम गायकवाड; सचिन गायकवाड; रतन अस्वारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

