बकरी ईद साधेपणाने साजरी करा, पोलीस प्रशासनाची मुस्लिम बांधवांना विनंती* पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (प्रमोद शिंदे)– बकरी ईद साधेपणाने सासरी करण्याचे पोलीस प्रशासनाकडून नातेपुते येथील मुस्लिम बांधवांना विनंती करण्यात आली.आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस प्रशासकीय उपविभागीय अधिकारीसो नीरज राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत व नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.१६ जुलै) रोजी सायंकाळी सहा वाजता दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.अकलूज विभागीय अधिकारी मिरज राजगुरू साहेब बैठकीत बोलताना म्हणाले की कोरोना संकट अद्याप टळलेले नसून मुस्लिम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी करावी कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी,बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.बकरे जुबा करू नये किंवा एकत्र जमू नये,असेही सूचित करण्यात आले.यावेळी दक्षता बैठकीस चेअरमन हाजीअक्रम बागवान,आमीन काझी,रमजान बागवान,लतीफ बागवान, बशीर काझी,सिकंदर मुलाणी ,नौशादआतार,आयुब काझी,मोहम्मद मुलाणी, शाहिदभाई मुलाणी,हमीद मुलाणी,वाजिद बागवान,निसार झारी,रियाजआतार,राजू शेख मुजम्मिन बागवान,समीरआतार व नातेपुते परिसरातील इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते.तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोलनकर साहेब यांनीआभार व्यक्त केले.या बैठकीचे पोलीस नाईक गणेश कापसे यांनी केले.