ॲड.डॉ.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” सदस्यपदी निवड
ॲड.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” सदस्यपदी निवड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –मुंबई दिनांक २५ जुलै २०२१: महिला व बालविकास मंत्री माननीय ॲड.यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” मध्ये नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवलजी उके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रश्न, धोरण, कायदे, विकासाचे उपक्रम व सध्या सुरू असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य या समितीद्वारे करण्यात येणार आहे. दिनांक २३ जुलै २०२१ रोजी याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने पारित केला आहे.
ॲड.डॉ.केवलजी उके यांची यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने “आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती” व अत्याचार पीडितांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या “राज्य आकस्मिकता योजना समिती” या दोन समित्यांवर नियुक्ती केलेली आहे तसेच ते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक हे आहेत. ऍड.केवलजी उके यांच्या सखोल अभ्यासामुळे व अनुभवामुळे शासनास नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आज पर्यंत बरीच मदत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्रालयीन समितीवर त्यांची नियुक्ती झाल्याने राज्यातील दुर्बल,गोरगरीब, जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे.
ॲड.केवलजी उके यांचा जनसंपर्क राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात असून क्रियशील व रचनात्मक काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. अशावेळी गावागावातील सामान्य जनतेचे प्रश्न ॲड.केवलजी उके हे मंत्रालयीन बैठकांमध्ये मांडून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःचे सामाजिक कौशल्य पणाला लावतील व समाजातील महिला, बालके आणि दुर्बल घटकांन न्याय मिळवून देतील अशी माहिती नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) या संघटनेचे राज्य सचिव मा.वैभव तानाजी गिते यांनी दिली आहे.