वंचित बहुजन आघाडीला पिरळे येथे प्रतिसाद
नातेपुते (प्रमोद शिंदे)- वंचित बहुजन आघाडी ला पिरळे येथे चांगला प्रतिसाद मिळाला असून तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांना पसंती देण्यात आली आहे. गाव भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांनी पिरळे, कळंबोली ,पळस मंडळ येथे मतदारांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान पिरळे येथील दलित वस्ती तसेच इतर ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्यावेळेस मातंग समाज बौद्ध समाज तसेच मराठा समाज नाभिक समाज तसेच बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान बहुजन आघाडी ला मतदान करण्याचे आव्हान राजकुमार यांनी केले यावेळेस सर्व समाजाने वंचित बहुजन आघाडी ला तिसरा पर्याय समजून पाठिंबा देण्याचं जाहीर केले आहे तसेच उमेदवार राजकुमार यांनी लोकांचा अडी-अडचणी जाणून घेतल्या व भविष्यात मी निवडून येऊ अथवा नयेऊ निश्चितच आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले मी चळवळीचा कार्यकर्ता आहे व या तालुक्यातील नातेपुते परिसरात माझं शिक्षण झाला आहे आर एस एस च्या जातीवादी भीमा कोरेगाव दंगल सहभाग असणाऱ्या बाहेरचे उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील उमेदवाराला मतदान द्या असे ते बोलत होते यावेळी उमेदवार राजकुमार सोनवणे, वंचित चे गायकवाड, आरपीआयचे राजेंद्र बल्लाळ, रामोशी समाज संघटनेचे अंकुश बुधावले ,मराठा समाज ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जाधव ,माजी सरपंच माजी सरपंच सुनील माने ,नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते विष्णू भाऊ खंडागळे, मातंग समाज संघटनेचे राजेंद्र खिलारे ,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.