रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*
रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न* नातेपुते (प्रमोद शिंदे)-श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिर येथे रथोउत्सवानिमित्त अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात 722 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषध उपचा करण्यात आले तसेच 30 ते 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले आहे या शिबिरासाठी डॉक्टर राजेश फडे फलटण ,डॉ.आदर्श मेहता सोलापूर, डॉ. वैभव गांधी अकलूज, डॉ. अजिंक्य होरा नातेपुते, डॉ.निखिल फडे पुणे, डॉ. नितीन लोंढे वालचंद नगर, डॉ. निखिल मिसाळ अकलूज, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव गांधी होते तसेच प. पू. 108 श्रमण मुनी श्री विनिश्चय सागर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयकुमार दोशी, डॉ. वैभव गांधी, नरेंद्र गांधी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. तसेच यावेळी दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील, शिबिर दाता पृथ्वीराज दोशी डॉ.उदय कुमार दोशी दहिगाव येथील ग्रामस्थ डॉ. विकास शहा अशोक दोशी ,डॉक्टर वर्धमान दोशी, डॉ. प्रशांत गांधी,शीतल गांधी ,व मेडिकल असोसिएशन सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला होता तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यागी भवन चिकित्सालया चे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंदिरामध्ये स्वर्गवासी वैभव कुमार अनंतलाल दोशी यांच्या स्मरणार्थ संगीतमय शांतीनाथ विधान सौ पद्मजा राजमहेंद्र अनंतलाल दोशी व दोशी परिवार यांच्यावतीने घेण्यात आले.