कोल्हापूर येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक गीताचे लोकार्पण

कोल्हापूर( प्रमोद शिंदे )कोल्हापूर येथील अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे गीत स्वरूपात लॉन्चिंग करण्यात येत आहे. संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चालबद्ध आणि संगीतबद्ध बनवून ही प्रास्ताविका गीत स्वरूपात सादर करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील प्रसिध्द गायक कबीर नाईकनवरे हे अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सलाम संविधान या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चाल आणि संगीत देऊन प्रास्ताविका गीत स्वरूपात सर्वांसमोर आणली आहे. या गीताला संगीत दिग्दर्शक म्हणून कबीर नाईकनवरे आणि निपाणी येथील दर्शन सुतार यांनी काम पाहिले आहे. या गीतामध्ये दहा गायकांनी गायन केले आहे. यामध्ये कबीर नाईकनवरे, दर्शन सुतार, संग्राम पाटील, मंदार पाटील, प्रसाद विभुते, मोहित कुलकर्णी, विशाल रेळेकर,स्नेहलता सातपुते, पुजा सावरे, सोनाली रायकर या गायकांचा समावेश आहे. या गीताच्या व्हिडिओ शुटचे काम कोल्हापूर येथील प्रसिद्ध कॅमेरामन सैफ बारगीर यांनी केले आहे.तर इडिटिंगचे काम विनायक व्हावळ यांनी केलं आहे. भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत अगदी सहज, सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम कबीर नाईकनवरे यांचे फौंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. त्यांच्या सलाम संविधान या प्रबोधनपर गीताचा कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आंनद भोजने, मंदार पाटील, अरुण पाटील, सैफ बारगिर आदी लोक उपस्थित होते.

You may have missed