जि प केंद्र शाळा कळंबोली शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी)

जि प केंद्र शाळा कळंबोली इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तसेच कळंबोली शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे सर यांनी  इयत्ता सातवीच्या आजी व माझी विद्यार्थ्यांना स्वखर्चातून  दुसऱ्या शाळेमध्ये जाण्यासाठी उत्तम प्रकारचे शाळेचे दप्तर,बाटली, जेवणाचा डबा व डबा पिशवी विद्यार्थ्यांना भेट दिली तसेच त्यांनी अगोदर सुद्धा माळशिरस तालुक्यातील तीनशे शाळांना शिष्यवृत्ती पुस्तकांचे संच दिले आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव संभाजी  फुले सर हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक संघ अध्यक्ष भोसले सर व अशोक रुपनवर व इतर मान्यवर होते. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सचिव संभाजी फुले सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे महत्त्वाचा आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो घेणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांनी या शाळेतून गेल्यानंतर मोठे होऊन आई-वडील शाळा शिक्षक व गावाचे नाव लवकि केले पाहिजे.आई वडील रोज कष्ट करून आपल्याला शिक्षण देतात त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे .तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी पाहिजे आपले आचार-विचार व संगत चांगले असली पाहिजे.साळवे सर हे आदर्श शिक्षक आहेत त्यांच्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व नाही तसेच विद्यार्थ्यांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी दादा साहेब साळवे सर, मुख्याध्यापक कलशेट्टी, केंद्रप्रमुख अशोक रुपनवर आदर्श शिक्षक समिती ता अध्यक्ष पोपट भोसले सर, पत्रकार प्रमोद शिंदे,विजय साळवे, मुख्याध्यापक कलशेट्टी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख बाबासाहेब झोडगे सर , आनंद लोंढे सर, घाडगे मॅडम,रानबा वाघमारे सर,पोपट भोसले सर, खिलारे मॅडम, बोधे मॅडम, अक्षय मोरे, कुमार मोरे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed