पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पिरळे येथे सतीश ढेकळे यांच्याकडून स्वखर्चातून पाण्याचा बोर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजक सतीश ढेकळे यांच्याकडून स्वखर्चातून मुलानी वस्ती येथे पाण्याचा बोर घेण्यात आला या बोरचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच संदीप नरोळे यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चष्मे वाटप शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत म्हणून मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफडी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बोलताना म्हणाले की पिरळे येथे नेहमीच स्तुत्य उपक्रम राबवले जातात विधायक कामांमध्ये पिरळे अग्रेसर आहे. अतिशय चांगले समाजहिताचे उपक्रम घेतले आहेत.पिरळे साठी पाच वर्षात दादांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे सतीश ढेकळे यांनी लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडून चांगले काम केले आहेत. तसेच बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की जातीपातीचे राजकारण सोडून आपण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहोत येत्या पंचायत समिती मध्ये पिरळे गावचा डंका शिवरत्न वर वाजला पाहिजे सर्वजण एकत्र मिळून विकासाचे काम करू.प्रास्ताविकात संदीप नरोळे यांनी गावासाठी मशानभुमी,प्राथमिक आरोग्य केंद्र, विज महामंडळाकडून सब टेशन,अंतर्गत रस्ते,गावठाणा साठी जागा मिळण्याची मागणी आमदार रणाजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली आहे.या कार्यक्रमास माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, राहुल वाघमोडे,प्रतापराव पाटील, संजय कोरडकर ,एकशिव गावचे सरपंच शहाजी धायगुडे, उद्योजक सतीश ढेकळ, अतुल शेटे प्रवीण पांढरकर,उमेश खिल्लारे माजी सरपंच बाबुराव,गायकवाड रवींद्र,सूर्यवंशी महादेव होळकर,संदीप वाघ,दादासाहेब शिंदे, दत्तात्रय लवटे, बाबासाहेब शिंदे,दादासाहेब किर्दक, दीपक शिंदे,भारत ग्रामसेवक शैला साळवे डॉ शरद शिंदे, डॉक्टर बर्गे,सुनील माने शांतिनिकेतन साळवे तसेच पंचक्रोशीतील नेतेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एच.व्ही देसाई नेत्र रुग्णालय मंमदवाडी पुणे सरपंच अलका नरोळे उपसरपंच कमल खिलारे सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी व भाऊसाहेब भिसे यांनी केले.
