रत्नत्रय शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- सोमवार 15 ऑगस्ट रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील सुप्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री मिलिंद रत्नकांत फडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी कवायत साजऱ्या करण्यात आल्या.
त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मनोगते व्यक्त करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये देशभक्तीपर गीत प्रासंगिक नाट्य यांचा समावेश होता. यावेळी मेणबत्तीच्या आकारातून तयार केलेल्या भारताचा नकाशा व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेल्या शुभेच्छा पत्रकाचे वेगळे दालन निर्माण करण्यात आले होते .सदर प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेची पार्श्वभूमी व भविष्यातील वाटचाल याचा मागोवा घेतला. त्यांनी 2025 पर्यंत एक आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहील असा आत्मविश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रतापगड राजस्थान येथील रोहित राजेश जैन यांनी बोलताना म्हणाले की “विद्यार्थ्यांनी देशाला आर्थिक सक्षम बनवण्याचा संकल्प करावा. येणारी पिढी हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला”
पुणे येथील समाजसेवक मिलिंद रत्नकांत फडे बोलताना म्हणाले की ” भारत हा एकमेव असा जगातील देश आहे की भारतामध्ये विविधतेत एकता आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आत्मविश्वास हा यशाचा खरा पाया आहे, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरती यशस्वी बनावे. शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील बदलानुसार बदल करावा भविष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे शैक्षणिक संक्रमण क्रांतीच्या रूपात होणार आहे.सर्वांनी संकटातून संधी शोधावी व मार्गक्रमण करण्याचे आव्हान त्यांनी केले. भविष्यात रत्नत्रय शैक्षणिक संकुल हे आदर्श शैक्षणिक संकुल होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. व पाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च देणार असल्याचे जाहीर केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी विद्यार्थी हे भविष्याचे नागरिक असून भविष्यात देश व्यसनमुक्त व भ्रष्टाचार मुक्त घडवावा असा संकल्प विद्यार्थ्यांना दिला. उत्तम नागरिक घडत असताना डोळ्यासमोर आदर्शवत जीवन ठेवण्याचे आव्हान त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास मिलिंद फडे, रोहित जैन,अनंतलाल दोशी, अजित दोशी ,
विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, संजय गांधी ,तनोज शहा , सुरेश गांधी, अभिजीत दोशी , संजय शिंदे , सुरज दोशी, संजय दोशी, विठ्ठल अर्जुन , ज्ञानेश राऊत, सतीश बनकर, दत्ता भोसले , रवींद्र कुलकर्णी, सागर उरवणे, चंद्रकात तोरणे, मृणालिनी भाभी दोशी, पूनम दोशी, सारिका राऊत, जाधव मॅडम , आणि शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आणि देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी रणदिवे मॅडम प्रस्ताविक दैवत वाघमोडे सर तर आभार प्रदर्शन अमित पाटील सर यांनी केले

