एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– दूतावास ओमन देशाचे दुतीय सचिव इंडियन फॉरेन सर्व्हिस(IFS) तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर विशाल लोंढे यांच्यासह नूतन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नातेपुते येथे एन डी एम जे संघटनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.
सुट्टी निमित्त ओमान येथून मायदेशी भारतात आलेल्या नातेपुते माळशिरस तालुक्यातील पहिले आय एफ एस भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव जयपाल देठे साहेब यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीते यांच्यावतीने करण्यात आले होते. तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे कोल्हापुर जिल्ह्यातील जातीय अत्याचारात खून झालेल्या सर्व खून प्रकरणात 5000 रुपये पेंशन मंजूर केल्याने केल्याबद्दल व नूतन प्रशासकीय सेवेत विराजमान झालेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव,सिद्धार्थ गायकवाड, वस्तू विक्री कर निरीक्षक शरद आढाव विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत,कृषी अधिकारी कोमल झेंडे,सहाय्यक अभियंता ऐश्वर्या भोसले,भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू किरण नवगिरे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख बनसोडे,बी ए एम एस डॉ. किरण चंदिशि, नातेपुते येथील वडार समाजातील पहिले एलएलबी वकील ऍड विजय काळे,तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव मा.जयपाल देठे, एन.डी. एम.जे राज्य महासचिव ऍड डॉ.केवलजी ऊके,Adv. बी.जी.बनसोडे, विकास दादा धाईंजे,वैभव गीते उद्योजक विनोदजी जाधव,दलित पॅथर चे नेते सु.ग.साबळे यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने छत्रपती शाहू महाराज आदर्श अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवर व अधिकाऱ्यांच्या वतीने आतापर्यंत 64 कुटुंबाचे पुनर्वसन केल्याबद्दल वैभव गीते यांचा सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक विजय सरतापे यांच्या भीम गीतांनी करण्यात आली व कार्यक्रमाचे सांगता सुप्रसिद्ध विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या कविताने करण्यात आले.या कार्यक्रमास एन.डी.एम जे चे शिवराम कांबळे,पंचशीलाताई कुंभारकर,बंदिश सोनवणे,शशी खंडागळे,विशाल साळवे,प्रमोद शिंदे रोहित एक मल्ली पंकजकाटे,यताळ खरबडे संघर्ष सोरटे संजय झेंडे बाबासाहेब सोनवणे सुनील भोसले नाना गायकवाड गणेश गायकवाड सचिन झेंडे मुंबई पुणे पंढरपूर सोलापूर बारामती इंदापूर फलटण नातेपुते व पंचक्रोशीतून कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.