ऍड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क- मुंबई संदेश भालेराव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे होणार आहे.

या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल. याची उंची १२५ फूट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. ११.४ एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

You may have missed