आमचा शिक्षक हा मेरीट चा शिक्षक आहे, वशिल्याचा शिक्षक नाही-गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
नातेपुते येथे प्रशिक्षण गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय जि प शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले की आमचा शिक्षक हा मेरिटचा शिक्षक आहे असल्याचा शिक्षक नाही प्रामाणिकपणे काम करतो. तसेचजी.प. प्राथमिक शाळा कळंबोली येथील आदर्श शिक्षक दादासाहेब साळवे सर यांनी संविधान दिन तसेच संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापरिनिर्वाण चित्ते साधून अभिवादन म्हणून, तालुका स्तरीय शिष्यवृत्ती शिक्षकांच्या कार्यशाळेत माळशिरस तालुक्यातील सर्व शाळांना 75 रुपयांचे शिष्यवृत्ती पुस्तकांचा संच मोफत दिले.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसंगी प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की दादासाहेब साळवे हे 2017 पासून शिष्यवृत्ती ची पुस्तक मोफत देत आहेत.आतापर्यंत तीन लाख रुपयाचे पुस्तक त्यांनी तालुक्यामध्ये दिले आहेत.त्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम होत आहे. तालुक्याच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच पुढे ते म्हणाले की झेड.पी ही सर्व सामान्य लोकांची आहे व ती टिकली पाहिजे.तालुक्यात स्वयंस्फूर्तीने काम करणारे शिक्षक आहेत म्हणून .झेड.पी शाळा टिकली आहे.जे शिक्षक शिष्यवृत्ती मध्ये शंभर टक्के निकाल आणतील त्यांचा विशेष सन्मान केला जाईल., शिक्षकांच्या मुलांसोबत सर्वसामान्यांची मुलं गुणवत्तेत आली पाहिजे. वर्गाचे सामान्य करण झालं पाहिजे. सर्वच मुले गुणवत्ता यादीत आली पाहिजे.अशा प्रकारे ते बोल होते. कार्यक्रमाचे प्रमुखातिथी म्हणून पत्रकार सुनील राऊत ,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,संतोष शिवणे सर, पत्रकार प्रमोद शिंदे,कोल्हापूर,चांद शेख सर, बा.ज दाते प्रशाला मुख्याध्यापक पिसे सर होते. सुनील राऊत बोलताना म्हणाले की तालुक्यातील शिक्षकांचे काम अतिशय चांगला आहे. पुढेही असंच त्यांनी काम करत राहावं. शिवणे सर यांनी उपस्थित शिक्षकांना निवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर सर,यांनी केले. यावेळी चंद्रशेखर शिवगुंडे सर, चव्हाण सर,दादा साळवे सर. माळशिरस तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.