छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त य.स.दा.संस्थेच्या वतीने विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांच्याजयंतीनिमित्त
डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शना खाली
य.स.दा.संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करून जयंती उत्साहात साजरी……

कल्याण तालुक्यातील रायते गावातील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास १०० विद्यार्थीना
शालेय साहित्य वाटप करण्यात
आले

[पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क :संदेश भालेराव]

यसदा संस्था महाराष्ट्र राज्य, मैत्री कट्टा आणि भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड यांच्या विद्यमाने काल कल्याण ग्रामीण मधील जिल्हा परिषद शाळा रायते येथे गरजू आणि गरीब मुलांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळा रायते या शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व फुलांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कल्याण परिमंडळ २ महावितरण अधीक्षक दिलीपजी भोळे सर, एडूको इंडिया प्रकल्प आधिकारी सुकांतजी बेहेरा सर, सेवानिवृत्त आयकर अधिकारी के.पी. सोमकुवर सर तसेच यावेळी यसदा संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ. केवलजी ऊके सर, य स.दा संस्थेचे सचिव शशिकांतजी खंडागळे, य.स.दा संस्थेचे सदस्य बंदीशजी सोनवणे, जिल्हा परिषद रायते शाळेच्या सौ. चित्रा प्रेमचंद बोंडे (मुख्याध्यापिका)
सौ. सीमा सुनिल जाधव ( सहशिक्षिका)
सौ. अर्चना राजेंद्र राठोड (सहशिक्षिका)
रायते गावच्या सरपंच स्मिता संतोष सुरोशी, रायते गावचे माजी सरपंच संतोष सुरोशी ,समाजसेवक विकास खंडागळे, उपक्रम समन्वयक भरत दळवी,
पत्रकार संदेश तुकाराम भालेराव, कुमारी खुशी केवल उके व अदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष योगदान गुरुनाथ पाल्ये,विजय घडशी, अनिल भिवा पाल्ये , हरिश्चंद्र कुवळेकर, अनिल पाल्ये यांचे होते. या कार्यक्रमासाठी रायते गावातील शिक्षण प्रेमी नरेश सुरोशी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात रायते शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने यसदा संस्था आणि मैत्री कट्टाकडे शाळेसाठी आवश्यक वस्तूंची मागणी करण्यात आली. शाळेला वह्या वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा रायते यांनी यसदा संस्था, मैत्री कट्टा आणि भरत दळवी युवा विकास मंच यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.