संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातेपुते नगरीत प्रशासनाची जोरदार तयारी


प्रशासनाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (प्रमोद शिंदे)
 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा  सोलापूर जिल्ह्यात येत आहे.  जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते तालुका माळशिरस येथे होत आहे. त्याच अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व नातेपुते करांकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. तसेच नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय येथे पोलीस प्रशासनाकडून पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे  सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक १, पोलीस उपअधीक्षक ४, पोलीसनिरीक्षक ११, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ४७, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ३. पुरुष पोलीस अंमलदार ३२२, महिला पोलीस ९२, वाहतूक पोलीस ५०, आरटीपीसी १०, गामा २१०, व्हिडिओग्राफर होमगार्ड पुरुष ३२५, महिला होमगार्ड ७०, एसआरपीएफ २५, पुरुष बॉम्ब शोध पथक २० व पुरुष ६३ असा पोलिसांचा ताफा तैनात आहे.तसेच महसूल प्रशासन, नातेपुते नगरपंचायत, आरोग्य विभाग, यांच्याकडून सुद्धा स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच विद्युत महावितरण अधिकारी यांच्याकडून ए बी केबल टाकण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून. ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहेत. तसेच महावितरण च्या वतीने पाच अधिकारी व 80 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.