मातीच्या गोळ्याला आकार देणारा महान गुरु म्हणजे शिक्षक : अनंतलाल दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

रंग ,रूप, धर्म ,जात या पलीकडे जाऊन शिष्याला आत्मज्ञान करून देणारा गुरु म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाची व्याख्या पटवून देताना क्षत्रिय कर्णाचे व गुरु परशुराम यांचा दाखला दिला तसेच कोणत्याही शिष्याने ठरवल्यास तो आपल्या गुरुच्या पुतळ्याकडूनही ज्ञान प्राप्ती करुन घेता येते हे एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांचा दाखला देत अनंतलाल दोशी यांनी कार्यक्रमावेळी प्रतिपादित केले.
आज एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन कार्य पाहून आनंद द्विगुणीत झाला आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थी शिक्षण देताना पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाही. विद्यार्थ्यांनी आपले नाव जगाच्या पातळीवर उज्वल करावे, या पेक्षा मोठा त्यांच्या शिक्षकांचा सन्मान नाही. रत्नत्रय स्कूल मधील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहे याचे समाधान वाटते.
हे सर्व केवळ शिक्षकांमुळेच आम्ही याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे रत्नत्रय स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केले. दिनांक 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा यांचा वाढदिवस रत्नत्रय इंग्लिश मीडियम ,विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचा एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सन्मान केला. शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रत्नत्रय सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा मा. श्री. अनंतलाल दोशी , स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी , वैभव शहा,बबन‌ गोपने , सुरेश धाईंजे , मुख्याध्यापक वाघमोडे सर,शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे इ.बारावी, दहावी इंग्रजी व सेमी व चे शिक्षक दिनानिमित्त झालेले सर्व शिक्षक वृंद ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुकन्या सरतापे हिने केले तर आभार समीक्षा शिंदे हिने केले.