उमेदवार पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसांत : मनोज जरांगे पाटील
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
लोकसभा निवडणुकीत मी कोणाचेही उमेदवार पाडले नाहीत. मराठ्यांनी पाडले, मी गरीब माणूस आहे. हे मात्र खरे आहे. गरीबांत किती ताकत आहे, हे देशाने आणि महाराष्ट्राने बघितले. आता विधानसभा निवडणुकीसाठी पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. त्यासाठी एक ते दोन दिवस पुरेसे आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ७) येथे सांगितले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.मी सामाजिक कामासाठी बाहेर आहे. हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि जिंकायचा आहे. मला हे बघायचे होते,उमेदवार दिले होते, आजही लोक तितकेच आहेत. लोकांमध्ये काही फरक पडलेला नाही, ते म्हणतात तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाले, पाडा तर पाडा. उमेदवार ज्यांना माघार घ्यायला लावली. त्यांचे पण काही म्हणणे नाही. काहींना समाजाच्या जीवावर काही व्हायचे आहे, समाजाला काही द्यायचे काम नाही, आणि ते समाजासाठी आम च्यासोबत नव्हते. पण मला आणि माझ्या समाजाला एकीचा फायदा समाजासाठी करायचा आहे, अगोदर मराठा समाजाने आपल्या लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर काढायचे, असेही जरांगे म्हणाले. आमच्या नादी लागू नका, आम्ही तुमचे काही विरोधक नाहीत, असा सिग्नल देण्यात आला.