पिरळे-नातेपुते एस.टी बस तात्काळ सुरू करण्यात यावी- प्रमोद शिंदे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
पिरळे-नातेपुते बस तात्काळ सुरू करण्यात यावी या संदर्भात एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमुख, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती नि.सदस्य प्रमोद शिंदे यांनी व्यवस्थापक अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून बांगार्डे-पिरळे-नातेपुते ही मुक्कामी असणारी एसटी बस काही कारणास्तव अचानक बंद केली गेली.ती एसटी बस पूर्ववत चालू करण्यात यावी.तसेच नातेपुते- वालचंद नगरला जाणाऱ्या सर्व बस.ह्या पिरळे मार्गे वळवून वालचंद नगर-नातेपुते ला सोडण्यात याव्यात. पिरळे हे परिसरातील गावाचा केंद्रबिंदू असून गावची लोकसंख्या 6000 पेक्षा जास्त असून या गावांमध्ये अनेक उद्योग धंदे सुरू आहेत.त्यामुळे या गावात पर गावातून तसेच पिरळे गावातून बाहेर जाणार- येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषता बाहेरगावी नातेपुते,दहिगाव,वालचंद नगरला शिक्षणासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनींची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे. पिरळे येथे सुद्धा आसपासच्या परिसरातील शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी कर्मचारी वर्गांची संख्या जास्त आहे.दळण वळणाच्या साधना अभावी विद्यार्थिनींचे व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.एसटी बस नसल्यामुळे अनेक वर्षापासून वृद्ध व महिला विद्यार्थी विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.विशेषता पिरळे गावाला चांगल्या प्रकारचे रस्ते असून एसटी बस येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.एसटी मुक्कामासाठी गावांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पिरळे -बांगार्डे- नातेपुते, वालचंद नगर बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी.अन्यथा एन.डी.एम.जे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत नातेपुते,पिरळे येथे रस्ता रोखो धरणे आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास एसटी प्रशासन जबाबदार राहील. 26 नोव्हेंबर पूर्वीच
लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी ही हे मागणी करण्यात आली आहे. यावर आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी बस सेवा सुरू करू अशा आश्वासन दिले आहे.