शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी म ोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed