मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मुलं म्हणजे देशाचे उज्वल भविष्य: अनंतलाल दोशी


आज आपल्या सभोवताली पाहिले तर मुलांचे मोबाईल मध्ये हरवलेले बालपण आपण अनुभवतो, तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आज फक्त आई-वडीलच नाही तर समाज, शिक्षक ,शाळा, मोबाईल, टीव्ही , समाजतील प्रत्येक व्यक्तीची, घटकाची ,माध्यमांची जबाबदारी आहे की त्यांनी उद्याचा उज्वल , महासत्ता भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे त्यासाठी मुलांवर योग्य शिकवण व शिक्षण देणे गरजेचे आहे कारण मुले म्हणजेच उद्याचा उज्वल भारत आहे प्रतिपादन अनंतलाल दोशी यांनी केले.
लहानपणीचा काळ आनंदाचा खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची इच्छा होती तर रंगीबेरंगी फुलपाखराची आवड होती.
आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता. मैदानी खेळ होते, सागर गोटे, सुरपाट होते पण आज मुलं मोबाईल मध्ये रमताना दिसतात, म्हणून आजच्या बाल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला आव्हान की प्रत्येक घटकाने या देशातील प्रत्येक मुल आपलेच आहे असे समजून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आणि आई वडील व शिक्षकांचा यात मोलाचा वाटा आहे. असे आवाहन केले.
गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस ‘(बालदिन’) तसेच रेड डे साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी हसत, खेळत, नाचत, गात उत्कृष्ट सजावटीमध्ये बाल दिनाचा आनंद लुटला, सर्व विद्यार्थी , शिक्षक लाल रंगांमध्ये उपस्थित होते.बाल दिना विषयी , पंडित नेहरू यांच्या बद्दल माहिती सांगण्यात आली, या कार्यक्रमासाठी उपस्थित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, रत्नत्रय प्री स्कूल, नातेपुतेचे सभापती वैभव शहा, स्कूलचे कमिटी मेंबर, सुरेश धाईंजे, दत्ता भोसले उमेश गोरे, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोरे तर आभार प्रदर्शन मेघा सुतार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed