रत्नत्रयइंग्लिश स्कूल मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो. त्यामुळे लहान मुलांना लहापणापासूनच फळे खाण्याची सवय लागावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये घेण्यात येतो. नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचा हा उपक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे मुलांमध्ये असणारे कला गुण दर्शविण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देणे. मुलांमध्ये स्टेज डेरिंग निर्माण करणे हा आहे. या दरम्यान मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी सचिन लवटे , राहुल लवटे, रघुनाथ वाघमोडे, अरुण वाघमोडे, जतेंद्र निंबाळकर, ज्योतीराम शिंदे, सौ माधुरी शिंदे, सौ रूपाली शिंदे, सौ पूनम खांडेकर, सौ ताराबाई वाघमोडे, सौ दिपाली वाघमोडे, सौ सोनाली वाघमोडे, सौ निकिता सोनवणे, सौ प्रतीक्षा सोनवणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मेघा सुतार मॅडम यांनी केले.फळवाटप दातार:श्री शशिकांत पंडित सर.