श्री अंकुश भाऊ सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विविध उपक्रम नातेपुते
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री अंकुश भाऊ सुर्वे फाउंडेशन व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांचे मार्फत मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अंकुश भाऊ सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये रक्तदान वृक्षारोपण जि. प . प्राथमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात आले.कै. अंकुश सुर्वे यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. जनसामान्य लोकांना मोठा आधार दिला .त्यांचे कार्य दीपस्तंभ सारखे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार आर. जी. रुपनवर यांनी केले .अंकुशभाऊ सुर्वे प्रतिष्ठान आणि विनायक भैय्या सुर्वे मित्रपरिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख होते. पुढे बोलताना रुपनवर यांनी अंकुश सुर्वे यांच्या अनेक आठवणी, अनेक समाज उपयोगी कार्यावर प्रकाश टाकला .यावेळी बोलताना बाबाराजे देशमुख म्हणाले, स्वतःची गरीब परिस्थिती असतानाही अंकुश सुर्वे यांनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला. लोकांच्या साध्या साध्या अडीअडचणी ते भागवत असत . बी.वाय. राऊत म्हणाले, अंकुशभाऊ लोकांच्या उपयोगी पडत असत. त्यामुळे त्यांचे जीवन हा आपल्या सर्वांच्या पुढे एक आदर्श आहे. विनायक सुर्वे यांनीही त्याच्या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला आहे. कै. अंकुश सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानच्या वतीने नातेपुते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन एलईडी टीव्ही, तीन प्रिंटर, तीन ग्रीन बोर्ड ,शाळांचे रंगकाम याचबरोबर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, तसेच इतर शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एलईडी टीव्ही नगराध्यक्ष अनिता लांडगे आणि नगरसेविका शर्मिला चांगण यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी विचार प्रवर्तक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांच्या रंगभरण, चित्रकला स्पर्धा ,तसेच वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा अनिता लांडगे ऋतुजा मोरे , शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा महामुनी ,एड.बी वाय राऊत, धैर्यशील देशमुख , ,माऊली पाटील, सतीश सपकाळ अर्जुन जठार, अतुल बावकर, रावसाहेब पांढरे ,अमित चांगण शशिकांत कल्याणी ,राहुल पद्मन हे उपस्थित होते. औदुंबर बुधावले व संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले आभार विनायक सुर्वे यांनी मानले.