मोहिते-पाटलांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात आपण लढतोय पिरळे येथून -मा.आमदार राम सातपुते
शंभर टक्के जिल्हा परिषद च्या अगोदर माळशिरस तालुका विधानसभा पोटनिवडणूक लागणार आमदार उत्तमराव जानकर यांना राम सातपुते यांचा इशारा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे भाजपच्या शाखेचे उद्घाटन तसेच गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ प्रसंगी माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राम सातपुते बोलताना म्हणाले की चाळीस-पन्नास वर्षाची मोहिते पाटलांची जुलमी राजवटीच्या विरोधात आपण लढत आहोत. इथल्या छोट्या छोट्या घटकावर मोहिते पाटलांनी जुलूम केला आहे.म्हणून यंदा निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे .पिरळ्यातील लोकांनी मला लीड दिल आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की आता त्यांच्यासोबत फक्त दोन नंबर करणारी लोक राहिलेले आहेत भविष्यकाळात हे सगळे दोन नंबर धंदे हळूहळू बंद करू भविष्यात कार्यकर्त्यांला ताकत देणार असून पिरळे गाव हे विकासासाठी मी दत्तक घेतला आहे. आपण महादेव मंदिर पुलाचे काम रस्त्यांचे काम आपण केली आहेत हे मोहिते पाटलांना कधी दिसला नाही. निवडणूक झाल्यानंतर माझा खोटा प्रचार केला मी माळशिरस तालुका सोडून जाणार, परंतु मी यांना मासनात पोहोचवल्या शिवाय जाणार नाही अशा प्रकारे मोहिते पाटील यांच्यावर टीका करत लवकरच माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अगोदर शंभर टक्के पोट निवडणूक लागणार असा चिमटा ही आमदार उत्तम जानकर यांना राम सातपुते यांनी काढला आहे. याप्रसंगी भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बी वय. राऊत, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर ,दादासाहेब लवटे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी महादेव मंदिर सभा मंडप, भाजपा शाखा उद्घाटन तसेच रामनगर रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास. भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर,प्रदेश सचिव सोपान काका नारनवर ,दिलीप पांढरे राजुशेठ पांढरे ,राहुल पद्मन, दत्तात्रेय रुपनवर, माऊली तरंगे हनुमंत करचे ,शशि कल्याणी,वैभव शहा ,अमित चांगण संतोष शिरतोडे, रितेश पालवे, संजय देशमुख, अशोक तोडकर,संभाजी साळवे,राजेंद्र बल्लाळ,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत पवार,पप्पू बुधावले,सचिन किर्दक, सुदाम बुधावले,सुरज माने,प्रल्हाद नरोळे,आनंदा लवटे,पांडुरंग माने, धनाजी दडस अनिल खिलारे तसेच शाखेतील पदाधिकारी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.









