केंद्र, राज्य सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
: ‘अतिवृष्टीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शे-तकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकस-ान झाले असून, त्यांच्यासाठी ३१ हजार ६२७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्य सरकार एवढ्याच मदतीवर थांबणार नसून, काही बाबींचा समावेश करून आणखी मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपत्तीग्रस्त शे तकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी स्पष्टोक्ती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक्-श्राव्य माध्यमातून झाला. योजनेत पालघर, राय-गड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवडझाली असून, त्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात राज्यस्-तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते. आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.भरणे म्हणाले, ‘या वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनींचे, घरां-चे नुकसान झाले. याबाबत पंचनामे सुरू असून, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत निधी जाहीर केला आहे. त्यासाठी बागायत, जिरायत, कोरडवाहू, खरडून गेलेली जमीन या प्रकारांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली आहे. तसेच, घरांची पडझड, बाधित पशुधन या नुकसानीबाबतही मदतमिळणार आहे. मात्र, वीजरोहित्र, वीजपंप, सौरपंप यांचेही मोठे नुकसान झाले असून, सरकार या बाबींचाही समावेश करणार आहे. त्यानुस -ार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा पंचनाम्यात समावेश करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा अहवाल केंद्राकडेटेंभुर्णी व परिसरातील खवैय्यांसाठी खुशखबर पाठवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत निधी दिला जाईल. “कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, उत्पन्नवाढीसा-ठी राज्यात ३,५०० ‘कृषी सखी’ काम करत आहेत. आणखी कृ-षी सखींनी यामध्ये सहभाग घेऊन शेतीला नवसंजीवनी द्यावी,’ असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.
