लढवय्या दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालय लढाई मागील पंधरा वर्षे लढत असलेले व विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करून जनजागृती आणि सामाजिक प्रबोधन करणारे दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे. दादाभाऊ अभंग हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रचंड असे लेखन करून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम केले आहे. शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर सामाजिक घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सतत वृत्तपत्रातून लेखन केले आहे. ते महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे एक स्वाभिमानी आणि विचारवंत म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख असून ते प्रसिद्ध स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व निर्भीड व्याख्याते आहेत. मागील पंधरा वर्षापासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न न्यायालयीन लढा लढत असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित केला असून हा पुरस्कार येत्या १० जून रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई, येथे सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांनीसांगितले की या पुरस्कारासाठी मला अनेकांनी सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाला त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी हा पुरस्कारर भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी लढलेल्या सर्व शूरवीर सैनिकांना, माझे आई वडील तसेच माझ्यावर प्रेम करणारे मला नेहमी साथ देणारे आणि माझ्या सोबत असणारे सर्व सहकाऱ्यांना मी हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्पण करत आहे..













































