मदर्स डे निमित्तानेआई अनुसायाची यशोगाथा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-साधारणतः 1982 साली नीराब्रिज , एकशिव , तालुका माळशिरस ,जिल्हा सोलापूर .येथील रहिवाशी गुलाब आनंदा बनसोडे यांची जेष्ठ कन्या अनुसया हिचा वयाने 16 वर्ष मोठा असलेल्या मुंबईस्थित पोलीस मुलाशी विवाह झाला खरा . परंतु मुंबईत आल्यापासून तिचे वनवासाच सुरु झाले . त्रास सुरु झाला . नवरा पोलीस असल्यामुळे इतरांचे काही चालत नसे . परंतु लग्नानंतर मुलीचे सासर हेच सर्वस्व असते त्या प्रमाणे तिने अगदी खंभीर पणे आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. आस्यातच 10-12 वर्ष निघून गेली , 3 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा झाला . तरीही त्रास चालू होता .उलट या चिमुरड्यांमुळे तिची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली . परंतु या परिस्तितीत मुलांमुळं तिला जगण्याचं बळ आलं.अन वेळप्रसंगी घरचा , मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी , मुलींच्या हॉस्टेल मध्ये काम करुन , तेथील मुलीना जेवणाचे डबे पूरवून परिस्थितीला न घाबरता जोमाने,जिद्दीने,चिकाटीने खंबीरपणे सामोरे जाऊन , मुलांना शिक्षण देऊन, उच्च शिक्षित बनवले, त्याच बरोबर , सुसंस्कृत बनवून धम्माचे अनुयायी बनवले . आज त्याचेच फळ म्हणून मोठी मुलगी मंजुषा सौदी अरेबिया येथे उच्च पदावर कार्यरत आहे . तर दुसरी मुलगी आणि मुलगा सुद्धा मुंबई मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यामुळे हा सर्व त्रास सहन करावा लागला तो नवरा म्हातारपणी जेंव्हा आजारी पडला तेंव्हा सुद्धा धम्माच्या नितीप्रमाणे सर्व माफ करुन त्याची 2वर्ष अविरत सेवा केली . ज्या वडिलांनी कधी डोक्यावरून मायेने हाथ फिरवला नाही त्या वडिलांची एव्हडी सेवा या उच्च sikshit मुलांनी केली आहे तशी मुले क्वचितच आजच्या युगात भेटतील .व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या लक्षात येईल . हे सर्व फक्त आणि फक्त त्या अडाणी आईच्या कष्टचे, त्यागचे फळ आहे . म्हणूनच तिने हा संसाररुपी रथ एकहाती purntwas आणून सोडला आहे . अत्यंत बिकट परिस्तिथीवर खंबीरपणे जिद्दीने लढून विजय मिळवनाऱ्या या आईला mothers day च्या लक्ष लक्ष शुभेच्छा . 💐💐💐