नातेपुते ग्रामपंचायतीने 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले
पँथर संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटवल्या
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केल्याने महाराष्ट्रतील गरीब,होतकरू,कष्ट करी मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येणाऱ्या काळात लोक कोरोना ने कमी पण उपासमारीने जास्त मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
परंतु आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखून तात्काळ माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा 15 टक्के निधी हा मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी वापरावा अशी मागणी केली गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मान्यता देऊन सर्व ग्रामपंचतीस 15%निधी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मागासवर्गीय कुटुंबाना वाटावा असे आदेश काढले, परंतु नातेपुते ग्रामपंचायतीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात कोणतेही पाऊल उचलत नाही असे पँथर संघर्ष सोरटे यांच्या निदर्शनास येताच रिपाइंचे शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन देऊन सामाजिक कौशल्य वापरून जीवनावश्यक वस्तू चे किट प्रत्येक मागासवर्गीय गरीब कुटुंबांपर्यंत पोहचवले.
हा पाठपुरावा करत असताना पँथर संघर्ष सोरटे यांना
रिपाइंचे नेते एन.के साळवे यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर विशाल साळवे, विनोद रणदिवे,समित सोरटे,वैभव सोरटे,राकेश सोरटे,राहुल सोरटे,विशाल सोरटे यांची साथ मिळाली यावेळी पाचशे कुटुंबीयांना लुंबिनी बुद्ध विहार येथे किट वाटप करण्यात आले यावेळी नातेपुते गावचे सरपंच ऍड.डी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मामासाहेब पांढरे उपसरपंच सुनंदाताई दादासाहेब उराडे ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा पांढरे, भारत सोरटे, महावीर साळवे, इत्यादी उपस्थित होते.
जनतेवर उपासमारीची वेळ येताच संघर्ष सोरटे यांनी दाखवलेले धाडस केलेला पाठपुरावा पाहून नातेपुते शहरातील व पंचक्रोशीतील जनता संघर्ष सोरटे यांचे कौतुक करून आभार मानत आहेत.
संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटविल्या अशी चर्चा घराघरात सुरू आहे.