माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही – शेखर खिलारे
माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही
– शेखर खिलारे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– सतत डोक्यात गोधळ घालणाऱ्या कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची गर्दी असणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जाण्याचा घाट वारकरी बांधव घालत आहेत.सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु एरवी वारी गावातून येऊन गेली तर वारीच्या मार्गावर व्हायरल इन्फेक्शन ताप,सर्दी,खोकला असे,आजार लोकांना होतात लोक आजारी पडतात. सध्याच्या काळात महामारी पुढे जगाने गुडघे टेकले आहेत वारीमध्ये एखादा जरी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर थोड्या काळात वारीच्या मार्गावरील गावा गावांमधून लाखोंच्या संख्येने लोक पॉझिटिव्ह होतील याचा विचार वारकरी संप्रदायाने करावा…!
११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले,१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,७ मे बुद्ध पौर्णिमा, तसेच १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.या महापुरषांचा जयंती उत्सव कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन जनतेने शासन व प्रशासन यांना सहकार्य करत घरातच समजूतदार पद्धतीने साजरा केला.
• मग तुमचाच हट्ट का ?
संत तुकोबाराय व संत ज्ञानेश्वर माऊली.या दोन्ही महाराजांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून जातात.आमच्या तालुक्यात एकही पेशंट नाही.
आमचा वारीला विरोध नाही संत तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आम्हाला ते पूजनीय आहेत आमच्या मनात संत तुकोबारायां बद्दल नितांत आदर आहे आपल्या कीर्तनातून त्यांनी बहुजन समाज सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न करून बहुजनांना सुधारले आहे.
संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज ,यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.परंतु सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पालख्या पंढरपूर पर्यंत घेऊन येणे योग्य नाही.एवढा कडक लॉकडाऊन असून सुद्धा महाराष्ट्रात कोरोना रोगाची संख्या वाढत आहे.आणि वारीत एखादा जरी पेशंट आढळला तरी या महाराष्ट्राला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व अजित दादा पवार यांची धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही.सरकारने वारी काढण्यास परवानगी देऊ नये.तरीसुद्धा परवानगी दिली तर आम्ही संत तुकोबाराय,संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आमच्या शहरातुन जाऊ देऊ.परंतु पादुका व्यतिरिक्त एक ही माणूस शहरातून जाऊ देणार नाही.याची नोंद घ्यावी सदरचे निवेदन या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हा अधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष सोलापूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मा.तहसीलदार माळशिरस,अकलुज पोलीस निरीक्षक अकलुज व सरपंच ग्रामपंचायत अकलूज यांना देण्यात आले आहे .