वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी अकलूज



वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मौजे वेळापूर व मौजे पिलीव ता माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा. अशी मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते, यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्राद्वारे केली होती , त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत .
आ राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघात मौजे वेळापूर व मौजे पिलीव हे दोन्ही येत असून तसेच राष्ट्रीय महामार्ग देखील या गावातून जात आहे.
या दोन्ही गावांची लोकसंख्या देखील एक लाख आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने मतदारसंघातील नागरिकांना सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार राम सातपुते यांनी मौजे वेळापूर व मौजे पिलीव या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी १५ सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली होती.त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.