बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मुंबई दि. 15 – बीड मधील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून पारधी समाजातील एकच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.
पारधी समाजातील तीन जणांची शेती च्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी हत्याकांडाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बीड चे जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी त्याच प्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे याप्रकरणाकडे लक्ष ठेऊन असून पीडित कुटुंबाची रिपाइं चे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तसेच गौतम बचुटे; बाळासाहेब ओव्हाळ या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तात्काळ भेट घेतली आहे. अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा असून गरीब शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी शोषित समुहाला रिपब्लिकन पक्ष कायम साथ देत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

        

You may have missed