नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा
नातेपुते परिसरात वादळ वाऱ्याचा शेतकऱ्यांना तडाखा*
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते तालुका माळशिरस परिसरात पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहेत वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना चांगला तडाखा बसला आहे. पावसासह वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यात शेतामध्ये उभी असलेली पिक कोसळले आहेत त्यामध्ये केळी मका अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या कोरोना चा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे गेली तीन महिने पासून शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे त्याला भाव नाही त्यामुळे आधीच तो अडचणीत आला आहे त्यात आता या वादळा वाऱ्याने तडाखा दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाले असून प्रामुख्याने शेती ही त्याच्या उपजीविकेचे साधन असून त्या शेतीवर कोरणा मुळे संकट आले आहे व आता निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर कोपत आहे. अशात शेतकऱ्याने करायचं तरी काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे? शेतकऱ्यांकडून सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी शासनदरबारी होत आहे परंतु शासन या शेतकऱ्यांची दखल घेणार का? हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.