Uncategorized

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात बाजार दिवस उत्साहात साजरा

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात बाजार दिवस उत्साहात साजरा
नातेपुते (प्ररतिनिधी) रत्नत्रे इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शनिवार रोजी सकाळी 9:00 वाजता बाजार दिवस चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाघाटन डॉक्टर रणजीत गजानन गुरव (शास्त्रज्ञ टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी टेक्सास युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .अनंतलाल दोशी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर होते. सदर प्रसंगी सदाशिवनगर चे नूतन सरपंच श्री विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी प्रशालेचे सदस्य वैभव शहा, अर्जुन धाइंजे,अभिमान सावंत, विष्णू भोगळे , रामदास कर्णे, बबन गोपणे, गजानन गोरे, माणता पाटील, बाहुबली दोशी, तुषार गांधी , सुरेश धाईजे, वसंतराव ढगे, शिवाजी लवटे, तानाजी पालवे, तुषार ढेकळे,
सौ.मृणालणी दोशी ,सौ.पूनम दोशी ,धनश्री दोशी,सारिका राऊत सदाशिवनगर ग्रामपंचायतचे नूतन सदस्य,प्रशाला कमिटी सदस्य, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना,खरेदी-विक्री, नफा-तोटा यातून व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. बाजारात विविध प्रकारचे 50 स्टॉल लावले होते.या बझार डे मध्ये एक लाख 45 हजाराची उलाढाल झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दैवत वाघमोडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी केले.

दहिगाव येथे ओबीसी आरक्षण संदर्भात आ.गोपीचंद पडळकर यांची घोंगडी बैठक


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते(प्रतिनिधी)दहिगाव तालुका माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते . बैठकीची सुरुवात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या बैठकीत गोपीचंद पडळकर म्हणाले की हा घोंगडी बैठकीचा दौरा राजकीय दौरा नसून उपेक्षित ओबीसी लोकांच्या हक्कासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केली आहे. या बैठकीचा शुभारंभ पंढरपूर पासून सुरू झाला आहे.सर्व ओबीसी समाजातील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे.मराठा आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे टिकू शकले नाही.ओबीसी मध्ये 340 जातीचा समावेश आहे.या सर्व जातींनी एकत्र आलं पाहिजे तसेच रामोशी समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याचे त्यांनी या बैठकीदरम्यान रामोशी समाजाचे अध्यक्ष अजित शिरतोडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.हे निवेदन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य दौलत नाना शितोळे व आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक भटक्या विमुक्त क्रांती असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लखन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते सुदाम बुधावले यांनी दिले.निवेदनात रामोशी बेडर या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी,.रामोशी समाजाचा विकास आराखडा तयार करावा तसेच रामोशी समाजाला प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वस्तीग्रह मिळावे.अशा अनेक मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले.यावेळी भाजपाचे नेते सोपान काका नारनवर,सरपंच ऍड.रणधीर पाटील,विजयसिंह पाटील,जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष अजित शिरतोडे,हनुमंत बुधावले,बापूसाहेब पाटोळे बाळासाहेब जगन्नाथ फुले, बाळासाहेब चव्हाण ,तुकाराम चव्हाण,प्रशांत साळवे,संतोष शिरतोडे,दादा मदने, ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांना रामोशी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले
रामोशी समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारताना आमदार गोपीचंद पडळकर
ओबीसी आरक्षण संदर्भात मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर

माळशिरस सिद्धार्थ नगर येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- नालंदा बुद्ध विहार सिद्धार्थनगर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माळशिरस नगर पंचायतचे मुख्य अधिकारी डॉ विश्वनाथ वडजे माळशिरस पोलिस स्टेशनचे पी आय गायकवाड साहेब तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सिद्धार्थ नगर व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी केले होते. या कार्यक्रमास मुख्य अधिकारी डॉक्टर विश्वनाथ वडजे पीआय गायकवाड साहेब,एपीआय महानवर साहेब,रिपाईचे ज्येष्ठ नेते दयानंद धाईंजे,दत्तू कांबळे,धनाजी पवार, बाबाजी सावंत,अशोक बापू धाईंजे,डॉ.कुमार लोंढे,विशाल साळवे,पत्रकार प्रमोद शिंदे,प्रदीप धाईंजे, महेश शिंदे,प्रा.ढोबळे सर,राम कांबळे, किरण धाईंजे श्रीकांत सावंत,दत्ता सावंत,बुद्धभूषण धाईंजे,रणजित धाईंजे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस सिद्धार्थ नगर येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम
सिद्धार्थ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना मुख्याधिकारी वडजे साहेब
पीआय गायकवाड साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कल्याण येथे बहुजन बहुउदेशीय संस्था च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण (संदेश भालेराव)

हुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले जयंतीचे औचित्य साधून नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.विजयजी कांबळे सरांच्या हस्ते व कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष मा ॲड.प्रविणजी बोदडे सरांच्या हस्ते व बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था प्रणित
सामाजिक सांस्कृतिक कला समिती चे उदघाटन संपन्न झाले आसुन ह्या संमिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष शाहीर सुरेश घोडेराव व उपाध्यक्ष कवि प्रविण भालेराव आहेत
ह्या संस्थेचे संस्थापक मा .विनोद शामसुदंर रोकडे हे आहेत संस्थेचे व बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेचे उपाध्यक्ष तसेच कार्यकमाचे अध्यक्ष आयु संदिप मधुकर घुसळे समिती चालु करण्या मागचा उद्देश काय असेल हे मार्गदर्शन करताना म्हणाले की काव्या च्या व गायणाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे चालवताना खुप मोठा उपयोग होईल व होतोच.
तसेच उदघाटन करत्या वेळी उपस्थित
संस्थेतील पदाधिकारी
मा विजय डि.कांबळे खजिनदार, ॲड.प्रविण बोदडे न्याय विधी सल्लागार, उपाध्यक्ष मा.संदिप घुसळे
संदेश भालेराव प्रसिद्धीप्रमुख,
नथुराम मोहीते कार्यालय प्रमुख
,सहहिशोब तपासनीस, राजेंद्र सावंत स्वागताध्यक्ष, तसेच सदस्य ,विक्रम जाधव,अविनाश बावस्कर, ,, सुरेश घोडेराव, श्रीधर शिंदे ,अविनाश जाधव,स्थानिक कार्यकर्ते कवी दिलीपनंद गायकवाड ,प्रविण भालेराव विजय निकाळे आदी मान्यवर उपस्थिित होते

शाहू महाराज जयंती निमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त नातेपुते येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संचालक डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराज जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ड्रेस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते च्या विद्यमान सरपंच कांचनताई लांडगे व उपसरपंच अतुल (बापू)पाटील हे होते. एपीआय सोनवलकर,उपसरपंच अतुल पाटील,सरपंच कांचन लांडगे यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमाचे कौतुक करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते,जी.प.शाळेचे शिक्षक बाबासाहेब झोडगे सर यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या उपक्रमात सहभागी होऊन शाहू महाराज जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शालेय साहित्य पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात भेट दिले.तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे,पुणे येथील श्रावणी आय टी कंपनी चेअरमन रमेश पांडेचरी,नातेपुते येथील उद्योजक बाबा बोडरे,यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतःचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.या कार्यक्रमास नातेपुते येथे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, संपादक अभिमन्यू आठवले साहेब,रासपचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याकअध्यक्ष शाहिद भाई मुलानी,दादासाहेब लांडगे,साई सेवादलाचे अध्यक्ष गुरु कर्चे,सोमनाथ भोसले,दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर
स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देताना उद्योजक बाबा बोडरे
श्रावणी आयटी कंपनीचे प्रोप्रायटर रमेश पांडेचरी यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस राज्य सचिव वैभव जी गीते साहेब यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले
सोलापूर जिल्हा परिषद विद्यमान सदस्य बाळासाहेब धाईंजे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले
श्रावणी आयटी कंपनीचे उद्योजक रमेश पांडेचरी यांनीसुद्धा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना महाराष्ट्र पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर साहेब व संपादक अभिमान या पाठवले
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देताना सोनव साहेब साहेब भाई मुलांनी
सरपंच कांचनताई लांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देताना
बाबा बोडरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला
संपादक अभिमान आठवले साहेब यांचा सत्कार करण्यात आला
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या उपक्रमाचे कौतुक करून नातेपुते चे अभ्यासू लोकप्रिय उपसरपंच अतुल बापू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या
प्रतिमा पूजन करताना साई सेवादलाचे गुरु कर्चे चे सोमनाथ भोसले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवनप्रकाश योजनेअंतर्गत घरगुती विजजोडणीचा नातेपुतेमध्ये शुभारंभ

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे व सरपंच कांचनताई लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन*

नातेपुते (प्रतिनिधी) नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ची मागणी नातेपुते ता.माळशिरस येथील सहाय्यक अभियंता श्री. दीपक कंकाळे साहेब यांना भेटून विनंती करण्यात आली होती.महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने दिनांक 12 एप्रिल 2021 रोजीच्या शासननिर्णयानुसार अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी राज्यात दिनांक 14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.महावितरण विभागाने 7 जून 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार योजनेची कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्व विहित केले आहेत.
नातेपुते येथे या योजनेचा शुभारंभ आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे व नातेपुते गावच्या सरपंच कांचनताई लांडगे यांच्या शुभहस्ते विद्युत मीटरची फीत कापून करण्यात आला.प्रथम संविधाननिर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता श्री कंकाळ साहेब यांनी जीवनप्रकाश योजनेचे स्वरूप व व्याप्ती सांगून जास्तीत जास्त लाभार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. वरिष्ठ लिपिक दत्ता रूपणवर साहेब यांनी नवीन विजजोडणीकरीता लाभार्त्याचा जातीचा दाखला व जागेचा असेसमेंट उतारा बंधनकारक असल्याचे सांगून फक्त पाचशे रुपये डिपॉझिट घेऊन घरगुती विजजोडणी मिटर देण्यात येणार आहेत हे जनतेस समजावून सांगितले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी ऊर्जा विभागाचे मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आभार मानत या योजनेची प्रत्येक गावात कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा यांनी ही योजना अतिशय चांगली असून संपूर्ण माळशिरस तालुक्यात या योजनेचा प्रसार-प्रचार करणार असल्याचे सांगितले. नातेपुते सरपंच कांचनताई लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक प्रमोद शिंदे यांनी सूत्रसंचालन तर विशाल साळवेंनी प्रास्ताविक केले.
उपस्थित नागरिकांनी वीजवितरण कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची प्रशंसा केली.यावेळी संजय झेंडे,रणजित कसबे,सचिन झेंडे,रवी झेंडे,सुनील भोसले,नवनाथ भागवत,संघर्ष सोरटे,प्रणव भागवत, प्रबुद्ध युवराज गायकवाड वंचितचे भाऊ भागवत हे उपस्थित होते
.

अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्नधान्याचे वाटप

अभिनेत्री नयन पवार यांनी केले शिवाजी मंदिर रंगकर्मींना अन्नधान्याचे वाट0 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनेश लोंढे –
मुंबईत, दि. १९ – गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. राज्यातील नाट्य, चित्रपटगृह बंद असल्याने बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावसर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

सरकारकडून वेळेवर मदत मिळत नाही. अश्या वेळेस त्यांनी काय करावे. संपूर्ण नाटय व्यवसायावर अवलंबून असलेले हे नाट्यकर्मी, त्यांनी आपले कुटुंब कसे राखायचे, जगवायचे. नाटकाचा प्रयोग असला तरच त्यांना पैसे मिळतात. नाटयनिर्माता, संस्था, कलावंत काही दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र काही महिने वगळता लॉक डाऊन सातत्याने चालू आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून लॉकडाऊन असल्याने नाट्य, चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने शिवाजी मंदिर या नाट्यगृहातील बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

        यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, दिलीप दळवी उपस्थित होते.

पंचवीस वर्षांपूर्वी वर्गात असलेल्या मित्रांनी वाचवले कोरोनाग्रस्त मित्राचे प्राण त्याला केली आर्थिक मदत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपंचवीस वर्षांपूर्वी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या गरीब कोरोनाग्रस्त मित्राचे वर्गातील मित्रांनी मदतीचा हात देऊन वाचवले प्राण यासंदर्भात हकीकत अशी की
प्रतापसिंह मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय शिवपुरी येथे शिकणाऱ्या सन 1995/96 बॅचच्या गरीब विद्यार्थी संतोष गंगणे राहणार बावन चाळ याला कोरोना ची लागण झाली होती.त्याचा स्कोर 25 असा होता त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.अशा परिस्थितीत कोठेही बेड उपलब्ध होत नव्हता.हे संतोष सोनवणे नावाच्या मित्राला समजले त्याने लगेच आपल्या 1995/96 च्या दहावीच्या बॅच मधील सध्या मुंबईत असणारे यमचंद बनसोडे या मित्राला संपर्क साधला व संपूर्ण हकीकत सांगितली.यावर यमचंद बनसोडे व संतोष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील बारीकराव यमगर व इतर मित्रांशी संपर्क साधून संतोष गंगणे या मित्राला आर्थिक मदत करून या संकटातून बाहेर काढण्याचे ठरवले.संतोष ची परिस्थिती खालावत चालली होती.या सर्वांनी प्रयत्न करून त्याला निमगाव येथील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिला. तसेच बाकीच्या मित्रांना आर्थिक मदत करण्यास आवाहन केले.सर्व मित्रांनी एकत्र येऊन संतोष गंगणे याच्या कुटुंबाला धीर दिला व आर्थिक मदत करून संतोष गंगणे या मित्राचे चे प्राण वाचवले. सर्वांनी मिळून त्याला व त्याच्या कुटुंबाला कोरोना संकटातून बाहेर काढले.तसेच त्याच्या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले.वर्ग मित्राला वाचवण्याची मित्रांची धडपड पाहून वर्ग शिक्षक सुतार सर,भोसले मॅडम व इतर मित्रांनी ही मदतीचा हात पुढे केला. वर्गशिक्षक भोसले मॅडम यांचा मुलगा डॉक्टर अभय भोसले यांनी मोफत उपचार करण्याचं ठरवलं. आपल्या या वर्ग मित्राला वाचवण्याचा आनंद गगनात मावेना. हा प्रसंग आमिर खानच्या थ्री इडीयट्स सिनेमा मधील राजू रस्तोगी,फरान आणि रँचो सारखा वाटतो.संतोष या आपल्या वर्ग मित्राला
बारीकराव यमगर,अय्याज मुल्लानी, नाना जाधव, दिलीप जाधव, पोपट बाबरभोसले मॅडम, आदरणीय सुतार सर, श्री संतोष सोनवने,अय्याज मुलांनी, मोहन सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोळी, शहाजी किर्दक, रोहिदास शिंदे, अमर नरुटे, अप्पासाहेब पैलवान, अनिल पवार, गौतम ओव्हाळ, संतोष कांबळे, सोमनाथ बनसोडे,दिनेश पटणे, अप्पा ढेकळे हरिदास सकट, देवराज वाघेला, बारीकराव यमगर, दिलीप जाधव, नाना जाधव, पोपट बाबर,शहाजी किर्दक, सचिन वरुडे,अनिल करे, भीमराव कदम, विजय रुपनवर.अधिकराव यमगर,यमचंद बनसोडे.यांनी आर्थिक मदत केलीच.त्यांच्या शिवाय मित्रांच्या मित्रांनी
पिरळे येथील उमेश खिल्लारे,वाघमोडे साहेब,हनुमंत शेलार,महेश शिंदे,विनोद शिंदे, श्रीकांत सोनावने, सचिन पिसे, समीर सोनावने , मनोज जाधव, अशोक थोरात, सुनील किर्दक, मंजुषा सोनार मॅडम. यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला.यापुढेही गरजूंना अशाच प्रकारे आमच्या बॅच कडून मदत केली जाईल असे मित्रांच्या वतीने सांगण्यात आले. संतोष गंगणे आणि परिवाराने या सर्व जीवदान देणारा मित्रांचे भावुक होऊन आभार व्यक्त केले

पंचवीस वर्षांपूर्वी वर्गात असलेल्या मित्रांनी वाचवले कोरोनाग्रस्त मित्राचे प्राण त्याला केली आर्थिक मदत

पेट्रोल,डिझेल,गॅस,दरवाढीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे माळशिरस तहसील वर धक्का मार आंदोलन

पेट्रोल,डिझेल,गॅस,दरवाढीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धक्का मार आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककेंद्र सरकार च्या चुकीच्या ध्येय धोरणां मुळे पेट्रोल आणि डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत.त्याचप्रमाणें खाद्य तेल 200 च्या पुढे गेले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील शोषित, वंचित, पीडित,कष्टकरी, शेतकरी,समाज देशोधडीला लागला आहे. ह्या दरवाढी मुळे त्याला त्याचे दैनंदिन जीवन जगायला खूप अवघड आणि बेताचे झाले आहे.त्यामुळे महागाई मुळे महाराष्ट्रातील ,शोषित, वंचित, पीडित,शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी,महिला वर्ग यांच्या दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे हे आत्महत्या चे प्रमाण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रीत ध्येयधोरनांनी वाढवलेल्या महागाई मूळे होत आहे. त्या मुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली महागाई लवकरात लवकर कमी करावी आणि तुम्हाला जर महागाई कमी करता येत नसेल तर तुमच्या खुर्च्यां खाली करा.आशा प्रमुख मागण्यांना घेऊन बहुजन मुक्ती पार्टी माळशिरस तालुका युनिट यांच्यामार्फत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मा.काकासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस मधील सर्व बहुजन महापुरुष यांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या पासुन तहसिल कार्यालय माळशिरस अशी शेकडो 2 व्हीलर ,3,व्हीलर,4 व्हीलर गाड्यांना धक्का मारत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या महागाई विरोधातील ध्येय धोरणांच्या विरोधात आंदोलन करून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार राज्य सरकार यांचा विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.व मा.तहसीलदार तुषार देशमुख यांना मागण्यांचे पत्र राष्ट्रपती यांना पाठवण्यासाठी दिले.

यावेळी ऍड.सीताराम सोनावले ऍड तुकाराम राऊत,डॉ.कुमार लोंढे,सौरभ वाघमारे ,संतोष गेजगे यांनी मार्गदर्शन केले.तसेच
मैत्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे.माहिती सेवाभावी संस्थेचे महेंद्र साठे,आरपीआय चे ता.अध्यक्ष प्रदीप सरवदे,जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भांगे,प्रहार चे अविनाश सोनवणे,नीता सुळे मॅडम सह मौर्य क्रांती संघटनेचे सत्यवान दुधाळ,भारतीय विद्यार्थि मोर्चाचे किरण बोलगड, सुदेश झेंडे, गणेश उदगिरे, सामाजिक कार्यकर्ते लखन बेंद्रे,हृतिक चव्हाण सह माळशिरस मधील सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनि या धक्का मारो आंदोलनाला साथ समर्थन दिल..

या धक्का मारो आंदोलन यशस्वी करण्यासाठी रिकेश चव्हाण,नागेश वाघंबरे,आबासाहेब वाघमारे ,श्याम मंडले,दिलीप बोडरे,दुर्गेश काळुंके,विशाल आगवणे यांनी प्रयत्न केली

पेट्रोल,डिझेल,गॅस,दरवाढीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धक्का मार आंदोलन

घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे

घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे

घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे
बेघरांना घरकुलासोबत शासकीय जागा मिळण्याचे शतक पूर्ण………वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील 4,फळवणी,फळवणी येथील 3,पळसमंडळ मधील 9 तर विझोरी या गावामधील 83 अशा एकूण सर्व जाती-धर्मांच्या शंभर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्याचा शासकीय आदेश प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या सहीने पारित झाल्याची माहिती नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव तानाजी गिते यांनी दिली.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने माळशिरस शहराचे माजी सरपंच मा.विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले होते.राज्य सचिव वैभवजी गिते यांनी माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार ! या इशाऱ्यानंतर माळशिरस तालुक्याचे तहसीलदार निंबाळकर यांनी एन.डी.एम.जे संघटनेच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन अनेक निर्णय घेतले होते.शंभर लाभार्थ्यांना शासकीय जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा देण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे असे मत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांनी मांडले.
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा.विकासदादा धाइंजे व राष्ट्रीय दलित दलित न्याय आंदोलनाचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते यांनी गोरगरिबांना हक्काचे घरकुल,घरकुलांना जागा मिळवून देण्याचा सपाटा लावला आहे.विकास दादा धाइंजे यांनी तहसीलदार,गटविकास अधिकारी, प्रांत यांच्याकडे पाठपुरावा करून परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवला तर वैभव गिते यांनी मंत्रालयीन पाठपुरावा करून विजयश्री खेचून आणला.कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेचे अतोनात हाल चालू असताना अनेक लोकप्रतिनिधी घाबरून घरात बसले आहेत पण आंबेडकरी चळवळीचे नेते मात्र गोरगरिबांना मदत करताना दिसतायेत.
100 लाभार्थ्याना घरकुले बांधण्यासाठी हक्काची शासकीय जागा मिळवून दिल्याने विकास दादा धाइंजे व वैभव गिते या जोडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

You may have missed