डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवनप्रकाश योजनेअंतर्गत घरगुती विजजोडणीचा नातेपुतेमध्ये शुभारंभ
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे व सरपंच कांचनताई लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन*
नातेपुते (प्रतिनिधी) नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ची मागणी नातेपुते ता.माळशिरस येथील सहाय्यक अभियंता श्री. दीपक कंकाळे साहेब यांना भेटून विनंती करण्यात आली होती.महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने दिनांक 12 एप्रिल 2021 रोजीच्या शासननिर्णयानुसार अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी राज्यात दिनांक 14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.महावितरण विभागाने 7 जून 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार योजनेची कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्व विहित केले आहेत.
नातेपुते येथे या योजनेचा शुभारंभ आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे व नातेपुते गावच्या सरपंच कांचनताई लांडगे यांच्या शुभहस्ते विद्युत मीटरची फीत कापून करण्यात आला.प्रथम संविधाननिर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता श्री कंकाळ साहेब यांनी जीवनप्रकाश योजनेचे स्वरूप व व्याप्ती सांगून जास्तीत जास्त लाभार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. वरिष्ठ लिपिक दत्ता रूपणवर साहेब यांनी नवीन विजजोडणीकरीता लाभार्त्याचा जातीचा दाखला व जागेचा असेसमेंट उतारा बंधनकारक असल्याचे सांगून फक्त पाचशे रुपये डिपॉझिट घेऊन घरगुती विजजोडणी मिटर देण्यात येणार आहेत हे जनतेस समजावून सांगितले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी ऊर्जा विभागाचे मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आभार मानत या योजनेची प्रत्येक गावात कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा यांनी ही योजना अतिशय चांगली असून संपूर्ण माळशिरस तालुक्यात या योजनेचा प्रसार-प्रचार करणार असल्याचे सांगितले. नातेपुते सरपंच कांचनताई लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक प्रमोद शिंदे यांनी सूत्रसंचालन तर विशाल साळवेंनी प्रास्ताविक केले.
उपस्थित नागरिकांनी वीजवितरण कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची प्रशंसा केली.यावेळी संजय झेंडे,रणजित कसबे,सचिन झेंडे,रवी झेंडे,सुनील भोसले,नवनाथ भागवत,संघर्ष सोरटे,प्रणव भागवत, प्रबुद्ध युवराज गायकवाड वंचितचे भाऊ भागवत हे उपस्थित होते.