शाहू महाराज जयंती निमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त नातेपुते येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संचालक डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराज जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ड्रेस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते च्या विद्यमान सरपंच कांचनताई लांडगे व उपसरपंच अतुल (बापू)पाटील हे होते. एपीआय सोनवलकर,उपसरपंच अतुल पाटील,सरपंच कांचन लांडगे यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमाचे कौतुक करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते,जी.प.शाळेचे शिक्षक बाबासाहेब झोडगे सर यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या उपक्रमात सहभागी होऊन शाहू महाराज जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शालेय साहित्य पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात भेट दिले.तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे,पुणे येथील श्रावणी आय टी कंपनी चेअरमन रमेश पांडेचरी,नातेपुते येथील उद्योजक बाबा बोडरे,यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतःचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.या कार्यक्रमास नातेपुते येथे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, संपादक अभिमन्यू आठवले साहेब,रासपचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याकअध्यक्ष शाहिद भाई मुलानी,दादासाहेब लांडगे,साई सेवादलाचे अध्यक्ष गुरु कर्चे,सोमनाथ भोसले,दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले.