पंचवीस वर्षांपूर्वी वर्गात असलेल्या मित्रांनी वाचवले कोरोनाग्रस्त मित्राचे प्राण त्याला केली आर्थिक मदत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– पंचवीस वर्षांपूर्वी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या गरीब कोरोनाग्रस्त मित्राचे वर्गातील मित्रांनी मदतीचा हात देऊन वाचवले प्राण यासंदर्भात हकीकत अशी की
प्रतापसिंह मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय शिवपुरी येथे शिकणाऱ्या सन 1995/96 बॅचच्या गरीब विद्यार्थी संतोष गंगणे राहणार बावन चाळ याला कोरोना ची लागण झाली होती.त्याचा स्कोर 25 असा होता त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.अशा परिस्थितीत कोठेही बेड उपलब्ध होत नव्हता.हे संतोष सोनवणे नावाच्या मित्राला समजले त्याने लगेच आपल्या 1995/96 च्या दहावीच्या बॅच मधील सध्या मुंबईत असणारे यमचंद बनसोडे या मित्राला संपर्क साधला व संपूर्ण हकीकत सांगितली.यावर यमचंद बनसोडे व संतोष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील बारीकराव यमगर व इतर मित्रांशी संपर्क साधून संतोष गंगणे या मित्राला आर्थिक मदत करून या संकटातून बाहेर काढण्याचे ठरवले.संतोष ची परिस्थिती खालावत चालली होती.या सर्वांनी प्रयत्न करून त्याला निमगाव येथील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिला. तसेच बाकीच्या मित्रांना आर्थिक मदत करण्यास आवाहन केले.सर्व मित्रांनी एकत्र येऊन संतोष गंगणे याच्या कुटुंबाला धीर दिला व आर्थिक मदत करून संतोष गंगणे या मित्राचे चे प्राण वाचवले. सर्वांनी मिळून त्याला व त्याच्या कुटुंबाला कोरोना संकटातून बाहेर काढले.तसेच त्याच्या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात आले.वर्ग मित्राला वाचवण्याची मित्रांची धडपड पाहून वर्ग शिक्षक सुतार सर,भोसले मॅडम व इतर मित्रांनी ही मदतीचा हात पुढे केला. वर्गशिक्षक भोसले मॅडम यांचा मुलगा डॉक्टर अभय भोसले यांनी मोफत उपचार करण्याचं ठरवलं. आपल्या या वर्ग मित्राला वाचवण्याचा आनंद गगनात मावेना. हा प्रसंग आमिर खानच्या थ्री इडीयट्स सिनेमा मधील राजू रस्तोगी,फरान आणि रँचो सारखा वाटतो.संतोष या आपल्या वर्ग मित्राला
बारीकराव यमगर,अय्याज मुल्लानी, नाना जाधव, दिलीप जाधव, पोपट बाबरभोसले मॅडम, आदरणीय सुतार सर, श्री संतोष सोनवने,अय्याज मुलांनी, मोहन सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोळी, शहाजी किर्दक, रोहिदास शिंदे, अमर नरुटे, अप्पासाहेब पैलवान, अनिल पवार, गौतम ओव्हाळ, संतोष कांबळे, सोमनाथ बनसोडे,दिनेश पटणे, अप्पा ढेकळे हरिदास सकट, देवराज वाघेला, बारीकराव यमगर, दिलीप जाधव, नाना जाधव, पोपट बाबर,शहाजी किर्दक, सचिन वरुडे,अनिल करे, भीमराव कदम, विजय रुपनवर.अधिकराव यमगर,यमचंद बनसोडे.यांनी आर्थिक मदत केलीच.त्यांच्या शिवाय मित्रांच्या मित्रांनी
पिरळे येथील उमेश खिल्लारे,वाघमोडे साहेब,हनुमंत शेलार,महेश शिंदे,विनोद शिंदे, श्रीकांत सोनावने, सचिन पिसे, समीर सोनावने , मनोज जाधव, अशोक थोरात, सुनील किर्दक, मंजुषा सोनार मॅडम. यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला.यापुढेही गरजूंना अशाच प्रकारे आमच्या बॅच कडून मदत केली जाईल असे मित्रांच्या वतीने सांगण्यात आले. संतोष गंगणे आणि परिवाराने या सर्व जीवदान देणारा मित्रांचे भावुक होऊन आभार व्यक्त केले

