घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे

घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे

घरकुलांना शासकीय जागा देण्याचा माळशिरस पॅटर्न राज्यभर करणार …..विकास धाइंजे
बेघरांना घरकुलासोबत शासकीय जागा मिळण्याचे शतक पूर्ण………वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील 4,फळवणी,फळवणी येथील 3,पळसमंडळ मधील 9 तर विझोरी या गावामधील 83 अशा एकूण सर्व जाती-धर्मांच्या शंभर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्याचा शासकीय आदेश प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या सहीने पारित झाल्याची माहिती नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव तानाजी गिते यांनी दिली.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने माळशिरस शहराचे माजी सरपंच मा.विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले होते.राज्य सचिव वैभवजी गिते यांनी माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार ! या इशाऱ्यानंतर माळशिरस तालुक्याचे तहसीलदार निंबाळकर यांनी एन.डी.एम.जे संघटनेच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन अनेक निर्णय घेतले होते.शंभर लाभार्थ्यांना शासकीय जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा देण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे असे मत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांनी मांडले.
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा.विकासदादा धाइंजे व राष्ट्रीय दलित दलित न्याय आंदोलनाचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते यांनी गोरगरिबांना हक्काचे घरकुल,घरकुलांना जागा मिळवून देण्याचा सपाटा लावला आहे.विकास दादा धाइंजे यांनी तहसीलदार,गटविकास अधिकारी, प्रांत यांच्याकडे पाठपुरावा करून परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवला तर वैभव गिते यांनी मंत्रालयीन पाठपुरावा करून विजयश्री खेचून आणला.कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेचे अतोनात हाल चालू असताना अनेक लोकप्रतिनिधी घाबरून घरात बसले आहेत पण आंबेडकरी चळवळीचे नेते मात्र गोरगरिबांना मदत करताना दिसतायेत.
100 लाभार्थ्याना घरकुले बांधण्यासाठी हक्काची शासकीय जागा मिळवून दिल्याने विकास दादा धाइंजे व वैभव गिते या जोडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

You may have missed